इन्स्टाग्रामवरील मित्राचा १५ वर्षाच्या शाळकरी मुलीवर बलात्कार; पुण्यातील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 15:54 IST2022-07-05T15:43:57+5:302022-07-05T15:54:04+5:30
प्रेमाच्या जाळ्यात ओढून केला बलात्कार...

इन्स्टाग्रामवरील मित्राचा १५ वर्षाच्या शाळकरी मुलीवर बलात्कार; पुण्यातील धक्कादायक घटना
पुणे : इस्टाग्रामवर झालेल्या ओळखीतून १५ वर्षाच्या शाळकरी मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी रोहन दास याच्या विरोधात गुन्हा नाेंदवण्यात आला आहे.
याबाबत पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. अधिक माहितीनुसार, शाळकरी मुलीची आरोपी दास याच्याशी इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिच्यावर बलात्कार केला.
मुलगी गर्भवती राहिल्याने हा प्रकार समाेर आला आहे. पीडितेने या प्रकाराची माहिती आईला दिल्यानंतर या प्रकरणात गुन्हा नाेंदवण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक वर्षा घोगरे तपास करत आहेत.
त्यामुळे सोशल मीडियावर वावरताना काळजी घेतली पाहिजे. तसेच तिथल्या मित्रांना भेटण्याअगोदर काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.