त्यापेक्षा राजकीय सोहळे आवरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:18 AM2021-02-21T04:18:54+5:302021-02-21T04:18:54+5:30
वाढत्या महागाईचा विचार करता पोट भरण्यासाठी नागरिकांना आता बाहेर पडावे लागत आहे. त्यासाठी लॉकडाऊन करण्याऐवजी राजकीय सगळ्यांनाच आवर ...
वाढत्या महागाईचा विचार करता पोट भरण्यासाठी नागरिकांना आता बाहेर पडावे लागत आहे. त्यासाठी लॉकडाऊन करण्याऐवजी राजकीय सगळ्यांनाच आवर घाला अशी प्रतिक्रिया उमटू लागली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सण-उत्सवांवर लग्नसोहळ्यातील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात आले. परंतु सध्याची स्थिती पाहता घरोघरी पार पाडणाऱ्या सोहळ्यांना मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. मास्क न लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे करणे या नियमांचे कोठे पालन होताना दिसत नाही. तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय सोहळ्यांना ही उधाण आले आहे.
उपनगरातील विविध उद्घाटन समारंभांना राजकीय पदाधिकारी उपस्थिती लावतात. त्यासोबत असंख्य कार्यकर्ते येतात. तसेच आत्ता पुन्हा नव्याने मंगल कार्यालयात हाजारोंच्या संख्येने होणारे लग्न साहळे, हळदीकुंकू समारंभ, शिबिरे, वाढदिवस आयोजन मोठ्या प्रमाणात केले जात आहे.
गेले वर्षभर कुठे बाहेर न गेलेले नागरिक कार्यक्रमांना हजेरी लावत असून नियमांचे पालन मात्र त्यांच्याकडून होत नाही. पालिका प्रशासन पोलीस यांच्या वतीने मास्क न घालणा-यांवर कारवाई थंडावल्याने रस्त्यावर अनेक नागरिक मास्क परिधान करत नाही किंवा केवळ कानावर मास्क लटकवून बिनधास्त फिरताना दिसतात. या सर्व गोष्टींचा विचार करता प्रशासनाने यावर त्वरित निर्बंध आणावेत, अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे.
★★★
फोटो ओळ:-खराडी जुना जकात नाका येथील भाजी मंडईत होणारी गर्दी.