...हा संस्था बंद पाडण्याचा डाव

By Admin | Published: July 25, 2015 04:14 AM2015-07-25T04:14:07+5:302015-07-25T04:14:07+5:30

एफटीआयआयमधील ‘महाभारता’ला आता वेगळेच वळण लागले आहे. ज्या संस्थेपासून राजकीय शक्ती दूर ठेवण्याच्या बाता मारल्या जात होत्या,

This institution will be closed | ...हा संस्था बंद पाडण्याचा डाव

...हा संस्था बंद पाडण्याचा डाव

googlenewsNext

पुणे : एफटीआयआयमधील ‘महाभारता’ला आता वेगळेच वळण लागले आहे. ज्या संस्थेपासून राजकीय शक्ती दूर ठेवण्याच्या बाता मारल्या जात होत्या, त्या संस्थेमध्येच आता विद्यार्थ्यांच्या विरोधातले राजकारण सुरू झाले आहे. विद्यार्थ्यांवर दाखल झालेला गुन्हा, संस्थेमध्ये मुले अमली पदार्थ घेत असल्याने पोलिसांची त्यांच्यावर असलेली करडी नजर आणि यातच आता पतितपावन संघटनेने या मुलांना अटक करण्यासाठी काढलेला मोर्चा या गोष्टींमधून विद्यार्थ्यांचे आंदोलन चिरडण्याचे प्रकार आता सुरू झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आंदोलन किती काळ तग धरणार हाच कळीचा मुद्दा आहे.
एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांचे आंदोलनाचे ४२ दिवस सरले तरी केंद्र शासनाने त्याची दखल घेतलेली नाही. मात्र हे आंदोलन संपवण्याचे प्रकार या ना त्या मार्गाने सुरू झाले आहेत. या साऱ्या गोष्टी संस्थेच्या आणि विद्यार्थ्यांच्या प्रतिष्ठेला कमीपणा आणणाऱ्या आहेत, असे सांगत हा विरोधी विचारांच्या व्यक्तींचा संस्था बंद पाडण्याचा डाव असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. तसेच विरोधक आंदोलनाला मूळ मुद्द्यांपासून हटवून वेगळे वळण लावत असल्याचेही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, चांदेकर यांनी संचालक मंडळातील सदस्य राहुल सोलापूरकर व अनघा घैसास यांच्या मदतीने दोन दिवसांनंतर दाखल केलेला गुन्हा कोणाच्या पाठिंब्यामुळे आहे हे वेगळे सांगायला नको.
मात्र पोलिसांनीही संस्थेत अमली पदार्थ आणले जातात, असे सांगून विद्यार्थ्यांची बाजू कमकुवत केली आहे. हे घडणारे सर्व प्रकार आंदोलन दडपण्यासाठी होत असल्याने विद्यार्थ्यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. यामागे कोण शक्ती कार्य करीत आहे, याचा शोध लागावा, यासाठी या प्रकरणाची निष्पक्षपातीपणे चौकशी व्हावी, अशीही मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: This institution will be closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.