अपंग प्रवाशाचा अपमान

By admin | Published: April 20, 2017 06:48 AM2017-04-20T06:48:24+5:302017-04-20T06:48:24+5:30

एकीकडे पीएमपीएमएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढे हे पीएमपीएमएलच्या कारभारात शिस्त आणत असले तरी दुसरीकडे पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांचा मुजोरपणा कमी होताना

Insult of disabled passenger | अपंग प्रवाशाचा अपमान

अपंग प्रवाशाचा अपमान

Next

पिंपरी : एकीकडे पीएमपीएमएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढे हे पीएमपीएमएलच्या कारभारात शिस्त आणत असले तरी दुसरीकडे पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांचा मुजोरपणा कमी होताना दिसत नाही. पीएमपीएमएल बसने प्रवास करणाऱ्या अपंग प्रवाशाला पीएमपीएमएलच्या वाहतूक नियंत्रकाने अपमानास्पद वागणूक दिल्याचा प्रकार समोर आला आहे. १५ दिवसांपूर्वी घडलेल्या या प्रकाराबाबत प्रवाशाने तक्रार देऊनही संबंधितांवर कोणतीही कारवाई झालेली नाही.
भोसरी येथे राहणारे संजय ब्राह्मणकर यांना या अपमानास्पद वागणुकीला सामोरे जावे लागले. या प्रकाराबाबत त्यांनी पीएमपीएमएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांना निवेदन दिले आहे. संजय हे अपंग आहेत. ३० मार्चला रात्री पावणेनऊच्या सुमारास भोसरीला येण्यासाठी पीएमपीएमएलच्या महापालिका बसस्थानकात गेले होते. बसस्थानकात जाताच भोसरीकडे निघालेली बस त्यांना दिसली. त्यांनी त्वरित चालकाला हात दाखवून बस थांबविण्याची विनंती केली.
मात्र, चालकाने बस न थांबविता पुढे नेली. त्यामुळे संजय यांनी स्थानकातील वाहतूक नियंत्रक कार्यालयात जाऊन बसचालकाबाबत तक्रार केली. मात्र, तेथील वाहतूक नियंत्रकाने आमच्याकडे चालक, वाहकाची नोंद नसल्याचे सांगितले. तसेच वरिष्ठ कर्मचाऱ्यांची नावे आम्ही ठेवत नाही, असे उद्धट उत्तर दिले. त्यावर संजय यांनी तुमच्याकडे नावे पाहिजे, असे सांगितले. त्यावर वाहतूक नियंत्रकाने संजय यांच्या अंगावर धावून जात त्यांच्या व्यंगावर अपशब्द वापरले.
तसेच सुरक्षारक्षकाला आवाज देऊन याला केबीनमधून हाकलून दे, असे सांगितले. याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, संबंधितावर कारवाई करावी, अशी अपेक्षा ब्राह्मणकर यांनी केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Insult of disabled passenger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.