खेड तालुक्यात चक्राकार रिंगरोडला तीव्र विरोध, शेतकरी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:09 AM2021-06-10T04:09:01+5:302021-06-10T04:09:01+5:30

एमएसआरडीसीच्या रिंगरोडसंदर्भात आयोजित केलेल्या बैठकीत प्रकल्पबाधित शेतकरी व खेड उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण, एमएसआरडीसीचे अभियंता संदीप पाटील, तहसीलदार वैशाली ...

Intense opposition to circular ring road in Khed taluka, farmers aggressive | खेड तालुक्यात चक्राकार रिंगरोडला तीव्र विरोध, शेतकरी आक्रमक

खेड तालुक्यात चक्राकार रिंगरोडला तीव्र विरोध, शेतकरी आक्रमक

googlenewsNext

एमएसआरडीसीच्या रिंगरोडसंदर्भात आयोजित केलेल्या बैठकीत प्रकल्पबाधित शेतकरी व खेड उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण, एमएसआरडीसीचे अभियंता संदीप पाटील, तहसीलदार वैशाली वाघमारे, तलाठी दीपक जाधव, मंडलाधिकारी चेतनकुमार चासकर यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत परिसरातील गावांमधील शेतकऱ्यांनी एक मताने रिंगरोडला विरोध दर्शविला आहे.रिंगरोडमुळे या परिसरातील शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे मुख्य साधन असलेल्या शेतजिनी प्रकल्पात जात असून त्यामुळे शेतकरी भूमिहीन होणार आहे, आधीच भामा-आसखेड पुनर्वसनासाठी जमिनीवर शिक्के आहेत, त्यातच आता रिंगरोड पुणे- नाशिक रेल्वेमार्गासाठी शिक्के टाकल्याने या भागातील शेतकरी भूमिहीन होणार आहे.

"शेतकऱ्यांच्या वतीने माजी सरपंच पाटीलबुवा गवारे यांनी बोलताना सांगितले की, या रिंगरोडमुळे शेतकरी पूर्णपणे भूमिहीन होणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत रिंगरोड होऊ देणार नाही. वेळप्रसंगी रक्त सांडण्याची तयारी आहे"

एमएसआरडीसीच्या रिंगरोडसंदर्भात निघोजे येथे आयोजित केलेल्या बैठकीत चर्चा करताना प्रकल्पबाधित शेतकरी व अधिकारी.

Web Title: Intense opposition to circular ring road in Khed taluka, farmers aggressive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.