खासगी शाळांकडून मनमानी शुल्क

By admin | Published: December 24, 2016 12:32 AM2016-12-24T00:32:06+5:302016-12-24T00:32:06+5:30

शहरातील अनेक इंग्रजी व मराठी माध्यमाच्या खासगी संस्थांकडून सहली आयोजित करण्याच्या व स्नेहसंमेलनाच्या नावाखाली

Intentional fees from private schools | खासगी शाळांकडून मनमानी शुल्क

खासगी शाळांकडून मनमानी शुल्क

Next

दिघी : शहरातील अनेक इंग्रजी व मराठी माध्यमाच्या खासगी संस्थांकडून सहली आयोजित करण्याच्या व स्नेहसंमेलनाच्या नावाखाली पालकांकडे अवाजवी शुल्क भरण्याची सक्ती केली.
पालिकेच्या शाळा सोडल्यास खासगी शाळेत प्रवेश मिळविण्यासाठी वर्गणीच्या नावाखाली मोठ्या रकमेची मागणी पालकांकडे केली जाते. शहरातील शाळेकडून सहली व स्नेहसंमेलनाच्या नावाखाली पैसे उकळण्याचा धंदा तेजीत आहे. पुणे दर्शनासाठी लहान मुलांना ६०० रुपये, तर पुण्याबाहेर जाणाऱ्या सहलीकरिता 1600 ते 2000 रुपयांची सक्ती केली जात आहे. सहलीला न जाणाऱ्या विद्यार्थ्यांकडून स्नेहसंमेलनाच्या आयोजनाकरिता प्रत्येक विद्यार्थी २०० ते ५०० रुपये अशी वाढती रक्कम पालकांना भरण्याची ठरावीक मुदत देण्यात येत आहे. स्नेहसंमेलनाची फी वेळेत न भरल्यास आयोजित स्पर्धेतून विद्यार्थ्यांना काढून टाकण्याचे व कलेपासून वंचित ठेवण्याचे आदेश शहरातील अनेक शाळा व्यवस्थापनाने काढल्याचे पालकांकडून समजते. नोटाबंदीत रांगेत दिवसभर उभे राहून सुद्धा पैसे मिळत नसल्याने कमालीचे संतप्त झाले आहेत. (वार्ताहर)

Web Title: Intentional fees from private schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.