अांतरजातीय विवाह करणाऱ्यांच्या संसाराला मिळताेय शासनाचा हातभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 05:49 PM2018-05-29T17:49:19+5:302018-05-29T17:49:19+5:30
अांतरजातीय विवाहांना प्राेत्साहन देण्यासाठी राज्य शासनाकडून अांतरजातीय विवाह करणाऱ्या जाेडप्यांना अर्थसहाय्य देण्यात येते. या याेजनेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत अाहे.
पुणे : अाज ही आपल्या समाजातून जात काहीकेल्या जात नाही. जातीयवादाची अनेक उदाहरणे गेल्या काही वर्षांमध्ये पाहायला मिळाली. परंतु एक गाेष्ट या जातीयवादाला अपवाद ठरत अाहे अाणि ते म्हणजे प्रेमविवाह. अनेक जाेडपी जातीयतेच्या पलीकडे जात अांतरजातीय विवाह करतात. अनेकदा प्रतिगामी विचारांची कुंटुंब अश्या जाेडप्यांना स्वीकारत नाही. अशावेळी या नवजाेडप्यांच्या संसाराला हातभार लावण्याचं काम सरकारकडून करण्यात येत अाहे. सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या अांतरजातीय विवाहास प्राेत्साहनपर अर्थसहाय्य याेजनेस चांगला प्रतिसाद मिळत असून 2017- 18 या वर्षात पुणे जिल्ह्यातील 295 अांतरजातीय विवाह केलेल्या जाेडप्यांना या याेजनेचा लाभ मिळाला अाहे.
सामाजिक विषमता दूर हाेऊन समाजामध्ये समतेची भावना रुजावी, त्यांच्यात एकात्मता दृढ व्हावी, समाज एकसंघ व्हावा, जातीपातीचे समुळ निर्मूलन व्हावे यासाठी राज्य सरकारकडून अांतरजातीय विवाहास प्राेत्साहनपर अर्थसहाय्य याेजना राबविण्यात येत अाहे. या याेजनेंतर्गत समजकल्याण विभागाकडे अर्ज करणाऱ्या जाेडप्यांना 50 हजार रुपये दिले जातात. नवीन जाेडप्याला अापला संसार सुरु करता यावा यासाठी ही मदत सरकारकडून करण्यात येते. त्याचबराेबर जास्तीत जास्त अांतरजातीय विवाह वाढून समाजातील जातीयता नष्ट व्हावी हे शासनाचे या याेजनेमागील उद्दीष्ट अाहे. या याेजनेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र अाहे. 2016-17 या वर्षांत 225 जाेडप्यांना या याेजनेचा लाभ मिळाला हाेता तर 2017-18 या वर्षात 295 जाेडप्यांना अार्थिक मदत करण्यात अाली अाहे.
याबाबत बाेलताना पुणे जिल्ह्याचे समाज कल्याण अधिकारी प्रविण काेरगंटीवार म्हणाले, या याेजनेमुळे अनेक जाेडप्यांचा संसार सुरु हाेण्यास हातभार मिळाला अाहे. अनेकदा अांतरजातीय विवाह करणाऱ्या जाेडप्यांना घरच्यांकडून मदत मिळत नाही. जी जाेडपी कमी उत्पन्न गटातील अाहेत त्यांना लग्नानंतर अनेक समस्यांचा सामना करावा लागताे. त्यांना या याेजनेचा माेठा फायदा हाेत अाहे. लाेक स्वतःहून अामच्याकडे या याेजनेची माहिती विचारण्यासाठी येत अाहेत. अामच्याकडे उपलब्ध असलेल्या निधीद्वारे अाम्ही जास्तीत जास्त जाेडप्यांना या याेजनेचा लाभ देत अाहाेत. समाज कल्याण विभागाची सर्वात यशस्वी अशी ही याेजना अाहे. समाजाने या याेजनेकडे चांगल्या दृष्टीने पाहायला हवे.
या याेजनेच्या अटी
1) लग्न हे 1 फेब्रुवारी 2010 नंतर झालेले असावे.
2) वराचे वय 21 वर्षे पूर्ण व वधुचे वय 18 वर्षे पूर्ण असावे.
3) वर व वधू दाेघेही महाराष्ट्राचे रहिवासी असावेत.
4) वर व वधू यापैकी एकजण हिंदू सवर्ण व दुसरी व्यकी हिंदू मागासवर्गीय प्रवर्गातील (एस.सी, एस.टी, व्ही.जे.एन.टी, एस.बी.सी ) असावी
5) ज्या ठिकाणी या याेजनेचा लाभ मिळविण्यासाठी अर्ज केला असेल त्या जिल्ह्याचा वर हा रहिवासी असावा.
6) वर व वधू दाेघांच्या नावाने संयुक्त खाते असावे
या याेजनेसाठी अावश्यक कागदपत्रे
1) विवाह नाेंदणी दाखला
2) वर व वधू यांचा शाळा साेडल्याचा दाखला
3) वर व वधू यांचा महाराष्ट्राचे रहिवासी असलेचा तहसिलदार किंवा जिल्हाधिकारी यांचा रहिवासी दाखला
4) वर व वधू यापैकी जे मागासवर्गीय असतील त्यांचा जातीचा दाखला
5) दाेन प्रतिष्ठित व्यक्तिंची प्रत्येकी दाेन शिफारस पत्रे
6) संयुक्त खात्याच्या पासबुकची झेराॅक्स प्रत
7) वधुवराचा एकत्र फाेटाे