इंटरसिटी एक्स्प्रेसची वेळ अजूनही चुकतेय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2019 01:14 PM2019-11-06T13:14:07+5:302019-11-06T13:18:32+5:30

‘पुश-पुल’चा उपयोग नाही : वेळेची बचत करण्यात अपयश

Intercity Express time is still missing | इंटरसिटी एक्स्प्रेसची वेळ अजूनही चुकतेय

इंटरसिटी एक्स्प्रेसची वेळ अजूनही चुकतेय

Next
ठळक मुद्देमुंबई ते पुणे मार्गावरही घाट क्षेत्रामुळे प्रवासासाठी अधिक वेळमध्य रेल्वेने पहिल्यांदाच राजधानी एक्स्प्रेससाठी पुश-पुल या नवीन पद्धतीचा केला वापर

पुणे : पुणे ते मुंबईदरम्यान धावणाºया इंटरसिटी एक्स्प्रेला पुश-पुल पद्धतीचा उपयोग होताना दिसत नाही. अजूनही या गाडीची वेळ चुकतच असल्याचे समोर आले आहे. पुश-पुलमुळे प्रवासात सुमारे पाऊण तासाची बचत होईल, असा दावा रेल्वेकडून करण्यात आला होता; पण प्रत्यक्षात हा दावा फोल ठरताना दिसते. बहुतेक वेळा या गाडीला २५ ते ५० मिनिटे विलंब होत असल्याचे दिसून येते. 

मध्य रेल्वेने पहिल्यांदाच मुंबईतून सुटणाऱ्या राजधानी एक्स्प्रेससाठी पुश-पुल या नवीन पद्धतीचा वापर सुरू केला. त्यामुळे या मार्गावरील प्रवासाचा पावणेदोन तासांचा वेळ कमी करण्यात रेल्वेला यश मिळाले. घाट क्षेत्रातही या पद्धतीचा रेल्वेला खूप उपयोग झाल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मुंबई ते पुणे मार्गावरही घाट क्षेत्रामुळे प्रवासासाठी अधिक वेळ जातो. त्यामुळे रेल्वेने प्रायोगिक तत्त्वावर इंटरसिटी एक्स्प्रेससाठी पुश-पुल पद्धतीचा वापर करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मे महिन्यात गाडीच्या वेळेत बदल करून ही पद्धत सुरू करण्यात आली. या गाडीला मुंबई ते पुणे प्रवासासाठी पूर्वी सुमारे सव्वातीन तासांचा कालावधी लागत होता. त्या वेळी ही गाडी मुंबईतून सकाळी ६.४० वाजता सुटून पुण्यात ९.५७ वाजता येण्याची वेळ होती. तर, पुण्यातून सायंकाळी ५.५५ वाजता सुटून रात्री ९.०५ वाजता मुंबई दाखल होत होती. बदललेल्या वेळांनुसार सध्या ही गाडी मुंबईतून सकाळी ६.५० वाजता सुटून पुण्यात ९.३० वाजता येणे अपेक्षित आहे. तर, पुण्यातून सायंकाळी ६.२५ वाजता सुटून मुंबईत रात्री ९.०५ वाजता पोहोचणे आवश्यक आहे. या वेळांप्रमाणे गाडीला २ तास ४०  मिनिटांचा कालावधी लागतो; पण प्रत्यक्षात हा प्रयोग सुरू झाल्यापासून बहुतेक वेळा गाडीने वेळा पाळलेल्या नाहीत.
मिळालेल्या माहितीनुसार, मागील पाच दिवसांत मुंबईतून पुण्याकडे येताना ही गाडी निश्चित वेळेपेक्षा २२ ते ४७ मिनिटे विलंबाने पोहोचली आहे. तर पुण्यातून मुंबईकडे जाताना १२ ते ४८ मिनिटांपर्यंत अधिक वेळ लागला आहे. यामध्ये दोन्ही बाजूंनी एकदाही गाडी वेळेत पोहोचली नसल्याचे दिसून येते. 
प्रामुख्याने मुंबईकडे जाताना लोणावळा सोडल्यानंतर आणि पुण्याकडे येताना कर्जतच्या पुढे घाट क्षेत्रात गाडीला विलंब होत असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वीही अतिरिक्त इंजिन जोडण्यासाठी या क्षेत्रात गाडीला विलंब होत होता. आता पुश-पुल पद्धत वापरूनही विलंब होत आहे. 
...........
घाट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने अजूनही देखभाल-दुरुस्तीची कामे सुरू आहेत. त्यामुळे या भागात गाड्यांना अजूनही अडचणी येत आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर सुधारणा होईल. राजधानी एक्स्प्रेसनंतर केवळ इंटरसिटी एक्स्प्रेसमध्ये पुश-पुल पद्धत वापरली जात आहे. ही नवीन पद्धत असल्याने त्याला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. - शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे.
.......
दोन्ही बाजूंना इंजिन : कर्जतला थांबा
४पुश-पुल पद्धतीमध्ये गाडीच्या दोन्ही बाजूंना इंजिन लावलेले असते.  पूर्वी घाट क्षेत्रात इंटरसिटी एक्स्प्रेसला कर्जत येथे इंजिन जोडण्यासाठी थांबावे लागत होते. त्यामध्ये वेळ जात होता. पुश-पुलमुळे अतिरिक्त इंजिन लावण्याची गरज नसल्याने कर्जतमध्ये थांबा घ्यावा लागत नाही. त्यामुळे हा वेळ कमी होणे अपेक्षित आहे.
...........
इंटरसिटी एक्स्प्रेसच्या निघण्या-पोहोचण्याच्या वेळा
दिवस    मुंबई ते पुणे    विलंब    पुणे ते मुंबई    विलंब
३१ आॅक्टो.     स. ६.५०     २७ मि.     सा. ६.२६    ४० मि.
दि. १ नोव्हें.     स. ६.५१    २२ मि.     सा. ६.२६    ४० मि.
दि. २ नोव्हें     स. ६.५०     ३५ मि.    सा. ६.२६    १२ मि.
दि. ३ नोव्हें.     स. ७.०४    ४७ मि.    सा. ६.३३    ४८ मि.
दि. ४ नोव्हें.    स. ६.५०    ३१ मि.    सा. ६.३०     ३० मि.
..............
पूर्वीची व सध्याची वेळ
    पूर्वीची    सध्याची 
मुंबईतून    स. ६.४०    स. ६.५०
पुण्यात    स. ९.५७    स. ९.३०
पुण्यातून    सा. ५.५५    सा. ६.२५
मुंबईत    रा. ९.०५    रा. ९.०५

Web Title: Intercity Express time is still missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.