शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल येत्या आठवड्यात

By admin | Published: May 11, 2017 04:33 AM2017-05-11T04:33:40+5:302017-05-11T04:33:40+5:30

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे फेब्रुवारी २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम

Interim result of scholarship examination in the coming week | शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल येत्या आठवड्यात

शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल येत्या आठवड्यात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे फेब्रुवारी २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल येत्या आठवड्यात परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केला जाणार आहे.त्यानंतर महिन्याभरात गुणवत्ता यादी प्रसिध्द करून शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांची घोषणा केली जाईल.
परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणा-या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी राज्यातील ९ लाख ४८ हजार २३६ विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरला होता. शिक्षण विभागातर्फे यंदा प्रथमच चौथी ऐवजी पाचवीच्या विद्यार्थ्यांची आणि सातवी ऐवजी आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. राज्यातील ५ लाख ४५ हजार ३५९ पाचवी विद्यार्थ्यांनी तर आठवीच्या ४ लाख २ हजार ८७७ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेस अर्ज केला होता. सर्व विद्यार्थ्यांना निकालाची उत्सुकता लागून राहिली आहे. यंदा प्रथमच ५वीच्या आणि ८वीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे.

Web Title: Interim result of scholarship examination in the coming week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.