आटोपशीर मैफलींमुळे निखळ आनंदात व्यत्यय
By admin | Published: December 9, 2014 11:54 PM2014-12-09T23:54:09+5:302014-12-09T23:54:09+5:30
रात्रभर चालणा:या मैफली, उत्तरोत्तर रंगत जाणारे राग यांमुळे पूर्वी सवाई गंधर्व महोत्सवात वेगळीच अनुभूती मिळायची.
Next
पुणो : रात्रभर चालणा:या मैफली, उत्तरोत्तर रंगत जाणारे राग यांमुळे पूर्वी सवाई गंधर्व महोत्सवात वेगळीच अनुभूती मिळायची. आता मात्र रात्री दहार्पयतच असलेली मर्यादा.. कलाकारांच्या आटोपशीर मैफिली.. यामुळे संगीताच्या निखळ आनंदात व्यत्यय येत असल्याच्या काहीशा ‘गोड’ तक्रारी करीत असतानाही सवाई गंधर्वाची आस अजूनही कायम असल्याचे संगीत रसिकांनी सांगितले.
अभिजात भारतीय संगीताच्या परमोच्च आनंदाची अनुभूती देणा:या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाच्या आगमनाची आसही या महोत्सवाच्या ‘वारक:यांना’ लागलेली असते. महाराष्ट्रातील कानाकोप:यातूनच नव्हे तर देशविदेशामधून अनेक रसिक या महोत्सवाला वर्षानुवर्षे हजेरी लावतात. दर्दी रसिकांसमोर कला सादर करण्याच्या आशेवरच कलाकारही कोणतीही बिदागी न घेता गुरुचरणी आपली सेवा अर्पण करतात. त्यामुळेच ही सांगीतिक महोत्सवाची परंपरा अखंडित राहण्याचे श्रेय जसे ‘तानसेनां’ना आहे तसेच ‘कानसेनां’नाही आहे. पुण्याच्या सांस्कृतिक विश्वात मानबिंदू ठरलेल्या या महोत्सवाविषयी कायमस्वरूपी ¬णानुबंध निर्माण झाले असल्याची भावना रसिक व्यक्त करतात.
विनायक चांदोरकर : सवाई गंधर्व संगीत महोत्सवाला 1972 सालापासून न चुकता येत आहे. फार पूर्वी अलिबागचा आमचा गृप मिळून आम्ही सगळे येत असू. ती मजा काही वेगळीच होती. हा महोत्सव आयोजित होण्याची आम्ही चातकाप्रमाणो वाट पाहायचो. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांतून रसिक महोत्सवाला येत असतं. यानिमित्त अनेकांच्या ओळखीही झाल्या.
रात्री 9 वाजता सुरू झालेल्या मैफिलीला उत्तरोत्तर रंग चढत असे. एका अनोख्या आनंदाची तृप्ती महोत्सवातून मिळे. कालपरत्वे महोत्सवात बदल झाले. आता 4 वाजता महोत्सवाला सुरुवात होत असल्याने संगीत ऐकताना वेगळी अनुभूती मिळत नाही. तरीही महोत्सवाबद्दल आपुलकी वाटत असल्याने आजही येणो कायम आहे.
(प्रतिनिधी)
वर्षभर जे दिग्गज कलाकार बाहेर ऐकायला मिळत नाहीत, ते सवाई गंधर्व महोत्सवामध्ये आवजरून ऐकायला मिळतात. 1952मध्ये महोत्सवाला केवळ 56 रसिक होते. मात्र, आज हजारोंमध्ये ही संख्या परिवर्तित झाली आहे. याचे सर्वस्वी श्रेय स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांना जाते. मंडपात एक किंवा 1क्क्क् रसिक असले तरी पंडितजी गात असतं. पावसाच्या दिवसांत पाट घेऊन रसिक महोत्सवाला येत असतं. पूर्वी दोन दिवस चालणारा हा महोत्सव आज चार दिवस रसिकांना विभिन्न कलाविष्कारांची मेजवानी देत आहे. मात्र, आता त्याला ‘कमर्शियल’ स्वरूप आले आहे. शंकर महादेवन, सुरेश वाडकर यांच्यानंतर आता कुमार शानूही महोत्सवात येईल, असे वाटते.
- डॉ. प्रकाश कामत
सवाई गंधर्व संगीत महोत्सवाला सांगीतिक विश्वात एक परिमाण प्राप्त झाले आहे. वीस वर्षापासून महोत्सवाला येत आहे. जुन्या आणि नव्या कलाकारांच्या कलाविष्कारांचा संगम ही एक अद्वितीय अनुभूती आहे. पूर्वी रात्रभर जागून मैफिलीचा आस्वाद घेणो हा सुखद अनुभव होता; मात्र आता तो आनंद मिळत नाही, याची खंत वाटते. मैफील लांबली तरी कुणाचा विरोध नसायचा. मात्र, आता दहाची मर्यादा पाळावी लागते. त्यामुळे रसिकांचा काही प्रमाणात रसभंग होतो.
- कबीर पटेल
एखाद्या वारक:याप्रमाणो 4क् वर्षापासून महोत्सवाला हजेरी लावत आहे. पूर्वी रेणुका स्वरूपमध्ये महोत्सव व्हायचा. त्यानंतर वर्षभराने गणोश कला क्रीडा रंगमंच येथे सुरूवात झाली. मात्र, फारसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग मैदानावर महोत्सवाची परंपरा सुरू झाली, ती खंडित झालेली नाही. पंडित भीमसेन जोशी यांनी लावलेले महोत्सवाचे रोप देशभर पसरले आहे. सुरुवातीला केवळ 3 रुपये महोत्सवाचे तिकीट होते. कालपरत्वे महोत्सवात रकमेसह तंत्रज्ञानाच्या दृष्टीने अनेक बदल झाले आहेत. स्क्रीनच्या व्यवस्थेमुळे लांब बसलेल्या रसिकांनाही महोत्सवाचा आस्वाद घेणो शक्य झाले आहे. महोत्सवात सादर होणारे नृत्याविष्कार ही रसिकांसाठी आनंददायी पर्वणी ठरते.
- वसंत कुलकर्णी