उपमहापौरपदावरून ‘आरपीआय’मध्ये अंतर्गत वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:27 AM2020-12-12T04:27:54+5:302020-12-12T04:27:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : भाजपाची एकहाती सत्ता असलेल्या पुणे महापालिकेच्या सभागृह नेते आणि उपमहापौरपदात बदल केला जात आहे. ...

Internal disputes in RPI over deputy mayor | उपमहापौरपदावरून ‘आरपीआय’मध्ये अंतर्गत वाद

उपमहापौरपदावरून ‘आरपीआय’मध्ये अंतर्गत वाद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : भाजपाची एकहाती सत्ता असलेल्या पुणे महापालिकेच्या सभागृह नेते आणि उपमहापौरपदात बदल केला जात आहे. सभागृह नेते बदलण्यात आल्यानंतर उपमहापौरपद पुन्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)ला देण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु, ‘आरपीआय’मध्ये या पदावरून वाद उद्भवला आहे. अल्पसंख्यांक सदस्याला संधी देण्याची मागणी एका गटाने केल्याने पदावरून उफाळलेला वाद केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यापर्यंत पोचला आहे.

पालिकेत भाजपा-आरपीआयची युती आहे. पद वाटपात उपमहापौरपद आरपीआयच्या वाट्याला आले. डॉ. सिद्धार्थ धेंडे उपमहापौरपदी होते. गेल्या वर्षीच्या पद बदलानंतर हे पद भाजपाने आपल्याकडे ठेवून घेतले होते. नाराज झालेल्या आरपीआयला पुढील वर्षी पुन्हा पद देण्याचे आश्वासन भाजपाने दिले होते. त्यानुसार यंदा उपमहापौरपद आरपीआयकडे जाणार आहे.

दरम्यान, मागील वर्षी आरपीआयने पालिकेतील गटनेतेपद सुनीता वाडेकर यांना दिले होते. तर, स्थायी समिती सदस्यपद हिमाली कांबळे यांना देण्यात आले होते. त्यामुळे रिपाईच्या एकमेव अल्पसंख्याक नगरसेविका फरजाना शेख यांनी उपमहापौरपदावर दावा सांगितला आहे. आरपीआयमधील एक गट शेख यांच्या बाजूने उभा राहिला असून त्यांनी सुनीता वाडेकर यांच्या नावाला विरोध सुरू केला आहे. हा वाद राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्यापर्यंत गेला असून त्यांनी सामोपचाराने मार्ग काढण्याची सूचना दिल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले.

चौकट

“रिपब्लिकन पक्षात सर्व जाती धर्मातील लोकांना समान न्याय दिला जातो असे म्हटले जाते. या पक्षात बौद्ध समाजाबरोबरच मातंग, मुस्लिम व इतर दलित जातीचेही कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात वर्षानुवर्षे काम करीत आहेत. त्यामुळे या अल्पसंख्याक समुदायाला न्याय मिळेल अशी आशा आहे.”

- फरजाना शेख, नगरसेविका

--------

Web Title: Internal disputes in RPI over deputy mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.