पुणे शहरात १४ वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या; आयुक्तांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2023 22:31 IST2023-06-19T22:31:08+5:302023-06-19T22:31:14+5:30
वाचा पोलीस अधिकाऱ्यांचे आत्ताचे आणि नवीन ठिकाणी बदलीचे ठिकाण

पुणे शहरात १४ वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या; आयुक्तांचे आदेश
पुणे - शहर पोलिस दलातील १४ वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी याबाबतचे आदेश सोमवारी रात्री काढले.
पोलिस निरीक्षकांचे नाव, (सध्याचे ठिकाण), पदस्थापनेचे ठिकाण : संगीता जाधव (बिबवेवाडी) गुन्हे शाखा (भरोसा सेल), अशोक इंदलकर (स्वारगेट) वाहतूक शाखा, सुनील झावरे (आर्थिक गुन्हे) स्वारगेट, विष्णु ताम्हाणे (खडकी) मुंढवा, राजेंद्र सहाणे (अलंकार) खडकी, राजेश तटकरे (लष्कर) अलंकार, सुनील जैतापूरकर (उत्तमनगर) वारजे माळवाडी, किरण बालवडकर (वाहतूक शाखा) उत्तमनगर, दगडू हाके (वारजे माळवाडी) सायबर, सुनील माने (विश्रामबाग) खडक, विनायक वेताळ (कोरेगाव पार्क) आर्थिक गुन्हे शाखा, नीलिमा पवार (गुन्हे वारजे माळवाडी) विशेष शाखा, अजय कुलकर्णी (आर्थिक गुन्हे शाखा) गुन्हे वारजे माळवाडी.