Police News: पिंपरीत पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2022 03:31 PM2022-01-09T15:31:39+5:302022-01-09T15:32:15+5:30

नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत अधिकाऱ्यांच्या बदल्या तसेच नियुक्त्या करण्यात आल्या आहेत

Internal transfers of Police Inspector, Assistant Inspector, Sub-Inspector in Pimpri | Police News: पिंपरीत पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

Police News: पिंपरीत पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

googlenewsNext

पिंपरी : नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत अधिकाऱ्यांच्या बदल्या तसेच नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. शहर पोलीस दलातील निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक आणि उपनिरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या झाल्या. नऊ पोलीस निरीक्षकांची अंतर्गत बदली झाली. दोन पोलीस निरीक्षकांना बंदोबस्ताच्या कारणास्तव संलग्न केले. तर एका पोलीस निरीक्षकाला प्रशासकीय कारणासाठी संलग्न केले. याबाबत शनिवारी (दि. ८) पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आदेश दिले.

पोलीस निरीक्षक राजेंद्र बर्गे (नियंत्रण कक्ष ते चिखली पोलीस ठाणे) आणि मनोज खंडाळे (नियंत्रण कक्ष ते विशेष शाखा) यांना बंदोबस्त, कामकाजाच्या दृष्टीने प्रशासकीय कारणास्तव तात्पुरत्या स्वरूपात संलग्न केले. तसेच देहूरोड पोलीस ठाणे येथून पोलीस निरीक्षक रावसाहेब जाधव यांना प्रशासकीय कारणास्तव पोलीस कल्याण शाखेला संलग्न केले आहे. पोलीस उपायुक्त गुन्हे यांचे वाचक असलेले सहायक पोलीस निरीक्षक गणेश पवार यांची आर्थिक गुन्हे शाखा तर गुन्हे शाखा युनिट चार येथील सहायक पोलीस निरीक्षक अंबरीश देशमुख यांना शस्त्र विरोधी पथक येथे बदली झाली. पोलीस उपनिरीक्षक तुकाराम शेळके (नियंत्रण कक्ष ते पोलीस उपायुक्त गुन्हे यांचे वाचक), महेश मुळीक (नियंत्रण कक्ष ते चिखली पोलीस ठाणे), श्रीनिवास दराडे (नियंत्रण कक्ष ते सांगवी पोलीस ठाणे), स्वप्नील वाघ (नियंत्रण कक्ष ते चिखली पोलीस ठाणे), शरद शिंपने (नियंत्रण कक्ष ते तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे), पौर्णिमा कदम (नियंत्रण कक्ष ते भोसरी एमआयडीसी पोलीस ठाणे), प्रशांत रेळेकर (नियंत्रण कक्ष ते विशेष शाखा - ओटीसी पथक), बाळासाहेब आढारी (नियंत्रण कक्ष ते विशेष शाखा), संतोष लांडे (नियंत्रण कक्ष ते चाकण पोलीस ठाणे) यांची अंतर्गत बदली झाली. 

सतीश माने यांच्याकडे प्रशासन, विशेष शाखा

सतीश माने यांना नुकतीच पोलीस निरीक्षक ते सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर बढती मिळाली. पदोन्नतीने त्यांची पिंपरी -चिंचवड पोलीस आयुक्तालयात पदस्थापना झाली. सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशासन या पदावर त्यांची तात्पुरत्या स्वरूपात नेमणूक झाली. तसेच त्यांच्याकडे सहाय्यक पोलीस आयुक्त विशेष शाखेचा अतिरिक्त कार्यभार देखील दिला आहे.  

अंतर्गत बदली झालेले पोलीस निरीक्षक

रंगनाथ उंडे (नियंत्रण कक्ष ते पिंपरी वाहतूक विभाग), डॉ. अमरनाथ वाघमोडे (नियंत्रण कक्ष ते तळवडे वाहतूक विभाग), विजया करांडे (नियंत्रण कक्ष ते निगडी वाहतूक विभाग), शंकर डामसे (नियंत्रण कक्ष ते निगडी पोलीस ठाणे - ओटा स्कीम), सुनील पिंजण (नियंत्रण कक्ष ते शस्त्र विरोधी पथक), वर्षाराणी पाटील (नियंत्रण कक्ष ते देहूरोड पोलीस ठाणे), ज्ञानेश्वर काटकर (नियंत्रण कक्ष ते गुन्हे शाखा युनिट एक), मच्छिन्द्र पंडित (नियंत्रण कक्ष ते गुन्हे शाखा युनिट चार), प्रसाद गोकुळ (गुन्हे शाखा युनिट चार ते एमओबी/पीसीबी).

Web Title: Internal transfers of Police Inspector, Assistant Inspector, Sub-Inspector in Pimpri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.