दीडवर्षांपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:08 AM2021-07-03T04:08:32+5:302021-07-03T04:08:32+5:30
पुणे : कोरोनाच्या पहिल्या लाटेत पुणे विमानतळावरून बंद झालेली आंतरराष्ट्रीय विमानसेवा अद्याप बंदच आहे. आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद होण्यापूर्वी ...
पुणे : कोरोनाच्या पहिल्या लाटेत पुणे विमानतळावरून बंद झालेली आंतरराष्ट्रीय विमानसेवा अद्याप बंदच आहे. आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद होण्यापूर्वी दुबई साठी आठवड्यातुन १० विमानाची सेवा होती. डीजीसीए यांची परवानगी नसल्याने आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद ठेवण्यात आली. सध्या केवळ देशांतर्गत विमानसेवा सुरू आहे. रोज सरासरी ३० ते ३५ विमानाचे उड्डाण पुणे विमानतळावरून होत आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पहिला लॉकडाऊन घोषित झाला. तेव्हापासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंदच ठेवण्यात आली. निर्बंध शिथिल केल्या नंतर केवळ देशांतर्गत विमानसेवा सुरू झाली . तीन वर्षापूर्वी पुणे विमानतळ वरून दुबई सह सिंगापूर, फ्रँकफर्ट साठी विमानसेवा होती. मात्र ती देखील २०१९ - २० मध्ये बंद झाली. मार्च २०२० पर्यंत केवळ दुबई साठी सेवा सुरू होती. लॉकडाऊन मध्ये ही सेवा बंद झाली. ती अद्याप बंदच आहे. लॉकडाऊन पूर्वी रोज सुमारे वीस ते पंचवीस हजार प्रवाशांची वाहतूक होत असे. आता सरासरी सात ते आठ हजार प्रवासी प्रवास करीत आहे.
----------------------
लॉकडाऊन पूर्वी पुण्याहून आंतरराष्ट्रीय विमानसेवेत केवळ दुबईसाठी सेवा सुरू होती. आठवड्यात १० फ्लाईट होत्या. लॉकडाऊनमुळे बंद झालेली सेवा अजूनही बंदच आहे.
- कुलदीप सिंग, विमानतळ व्यवस्थापक,
पुणे विमानतळ