आंतरराष्ट्रीय उड्डाणे आता नव्या टर्मिनलवरून;आजपासून आंतरराष्ट्रीय प्रवास होणार आणखी सुलभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 19:53 IST2024-12-23T19:49:27+5:302024-12-23T19:53:46+5:30

उड्डाणांसाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक तयारीचा आढावा मंत्री मोहोळ यांनी विमानतळाच्या विविध विभागाच्या अधिकाऱ्यांकडून घेतला.

International flights now from new terminal; international travel will be even easier from today | आंतरराष्ट्रीय उड्डाणे आता नव्या टर्मिनलवरून;आजपासून आंतरराष्ट्रीय प्रवास होणार आणखी सुलभ

आंतरराष्ट्रीय उड्डाणे आता नव्या टर्मिनलवरून;आजपासून आंतरराष्ट्रीय प्रवास होणार आणखी सुलभ

पुणे :पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील जुन्या टर्मिनलवरून होणारी सर्व उड्डाणे आता नव्या टर्मिनलवरून होणार असून, याची अंमलबजावणी मंगळवार (दि. २४) पासून करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. उड्डाणांसाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक तयारीचा आढावा मंत्री मोहोळ यांनी विमानतळाच्या विविध विभागाच्या अधिकाऱ्यांकडून घेतला.

लोहगाव येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवीन टर्मिनल पाच महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले असून, या टर्मिनलवरून होणाऱ्या उड्डाणांची संख्या टप्प्याटप्प्याने वाढवण्यात आली आहे. मात्र, इमिग्रेशनची परवानगी न मिळाल्याने नव्या टर्मिनलवरील उड्डाणाला मर्यादा होती. परंतु, इमिग्रेशनची परवानगी प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे. याबाबत मोहोळ यांनी या सर्व प्रक्रियेचा आढावा घेतला आणि तांत्रिक बाबींसंदर्भात माहितीही घेतली.

मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘पुणे विमानतळावरून आताच्या घडीला एकूण ३ मार्गांवरून ५ आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू आहेत. ही सर्व उड्डाणे नव्या टर्मिनलकडे स्थलांतरित करण्यात आली आहेत. आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठी पुणेकर प्रवाशांसाठी आजवर जुनेच टर्मिनल वापरले जात होते, ज्यावर अद्ययावत सुविधांचा अभाव होता. आता मात्र आंतरराष्ट्रीय प्रवासाची सुरुवात सुखकर होणार आहे.’ ‘इमिग्रेशन संदर्भातील तांत्रिक प्रक्रिया पूर्णत्त्वास नेऊन नवे टर्मिनल आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. पुणे विमानतळाच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असून, अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्याची मालिका अशीच अखंडित राहील’, असेही केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले.

Web Title: International flights now from new terminal; international travel will be even easier from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.