अमोल बागडे यांच्या चित्राची आंतरराष्ट्रीय पातळीवर निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:12 AM2021-02-26T04:12:21+5:302021-02-26T04:12:21+5:30
२० मार्च ते २० एप्रिल २०२१ दरम्यान आंतरराष्ट्रीय चित्रकला प्रदर्शन तैवान येथे संपन्न होत असून, जगभरातून आलेल्या ऑइल, पेस्टल, ...
२० मार्च ते २० एप्रिल २०२१ दरम्यान आंतरराष्ट्रीय चित्रकला प्रदर्शन तैवान येथे संपन्न होत असून, जगभरातून आलेल्या ऑइल, पेस्टल, अॅक्रेलिक, जलरंग या विविध प्रकारच्या ३ हजार चित्रांमधून अंतिम १५१ चित्रकारांचे निवडलेल्या चित्र प्रदर्शनात अमोल बागडे यांनी काढलेले जलरंग प्रकारातील चित्र प्रदर्शनात निवड झाली आहे. अमोल याला शालेय जीवनापासून चित्रकलेची आवड असून, भोर शहरातील राजा रघुनाथराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी अभिनव कला महाविद्यालय पुणे येथून चित्रकलेचे शिक्षण पूर्ण केले आहे. वडिलोपार्जित कापड दुकान व्यवसाय सांभाळून त्यांनी फक्त कलेची आवड जोपासली नाही तर भोरसारख्या ग्रामीण भागातील चित्रकाराने आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घेतल्याने त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
२५ भोर चित्र