International Yoga day 2018 : ...म्हणून त्यांनीही केला याेग दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 12:12 PM2018-06-21T12:12:52+5:302018-06-21T12:23:01+5:30
अांतरराष्ट्रीय याेग दिनानिमित्त राज्यातील कारागृहांमध्ये कैद्यांनी याेगासने केली. 2015 पासून दरवर्षी कारागृहांमध्ये याेगदिन साजरा केला जाताे.
पुणेः रागाच्या भरात किंवा इतर कारणांनी गुन्हा केला जाताे, अाणि त्याची शिक्षा अायुष्यभर भाेगावी लागते. अाराेपी असले म्हणून काय झालं...त्यांचं अाराेग्यही महत्त्वाचं अाहे हा विचार घेऊन राज्यातील सर्व कारागृहांमध्ये जागतिक याेग दिनानिमित्त कैद्यांकडून याेगासने करुन घेण्यात अाली. या कार्यक्रमात राज्यातील 20 ते 25 हजार कैदी सहभागी झाले हाेते. पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहातही याेगदिन उत्साहात साजरा करण्यात अाला. यावेळी माेठ्याप्रमाणावर कैद्यांनी याेगासने केली.
पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या प्रयत्नातून 21 जून हा दिवस जागतिक याेग दिवस म्हणून 2015 पासून जगभरात साजरा करण्यात येत अाहे. याेगाचे अापल्या अाराेग्यासाठी माेठे फायदे अाहेत. सध्याच्या धकाधकीच्या अायुष्यात प्रत्येकजण हा ताणतणावाचा सामाना करत अाहे. या ताणतणावाचे अाराेग्यावर विपरीत परिणाम हाेत असतात. याेग केल्याने या ताणतणावातून मुक्ती मिळण्यास मदत हाेते. साऱ्या जगाला याेगचे महत्त्व कळाल्याने जगभरात 21 जून राेजी याेगासने करण्यात येतात. राज्यातील कारगृह प्रशासनाने या दिवसाचे अाैचित्य साधत राज्यातील सर्व कारागृहांमध्ये याेग दिन उत्साहात साजरा केला. 2015 पासून हा याेग दिन कारागृहांमध्ये साजरा करण्यात येत अाहे.
याबाबत बाेलताना अतिरिक्त कारागृह महानिरिक्षक भूषणकुमार उपाध्याय म्हणाले, 2015 पासून राज्यातील कारागृहांमध्ये याेग दिन उत्साहात साजरा करण्यात येताे. कारगृहांमध्ये कैद्यांना नियमित याेगाचे धडे दिले जातात. अाजच्या दिवशी माेठ्याप्रमाणावर कैदी याेगासने करतात. याेग दिनानिमित्त राज्यातील सर्व कारागृहांमधील 20 ते 25 हजार कैद्यांनी एक ते दीड तास याेगासने केली. याेगचा फायदा कैद्यांना व्हावा, तसेच जेल प्रशासनाकडूनही याेगाचा प्रसार व्हावा या हेतून हा दिवस साजरा केला जाताे. 2015 पासून दरवर्षी कारागृहांमध्ये याेगदिन उत्साहात साजरा केला जाताे.