हस्तक्षेप करणाऱ्या शिवसेनेच्या मंत्र्यांनेही राजीनामा द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 02:01 PM2021-03-21T14:01:23+5:302021-03-21T14:17:12+5:30

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मागणी

Intervening Shiv Sena ministers should also resign | हस्तक्षेप करणाऱ्या शिवसेनेच्या मंत्र्यांनेही राजीनामा द्यावा

हस्तक्षेप करणाऱ्या शिवसेनेच्या मंत्र्यांनेही राजीनामा द्यावा

Next
ठळक मुद्देपुण्यातील अलका चौकात चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सिंग यांनी लेटरबॉम्ब केल्यावर देशमुख यांनी राजीनामा देण्यावरून राजकीय वर्तुळ ढवळून निघाले आहे. या प्रकरणात शिवसेनेच्या कुठल्याही मंत्र्यांनी हस्तक्षेप केला. तर त्यांनीही राजीनामा द्यावा. अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. पुण्यातील अलका चौकात चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी अशी मागणी त्यांनी केली. 

अब तो ये स्पष्ट है, ठाकरे सरकार भ्रष्ट है, राजीनामा द्या राजीनामा द्या ठाकरे सरकार राजीनामा द्या आशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या आहेत.  मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबिर सिंग यांनी केलेल्या आरोपामुळे अनिल देशमुख वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी शहरात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले.

पाटील म्हणाले, महाविकास आघाडी सरकार अशा गोष्टींना संरक्षण देण्याचा काम करत आहे. याचा आम्ही निषेध व्यक्त करतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घ्यावा. सखोल चौकशी करावी. जमत नसेल तर तुम्ही स्वतः राजीनामा द्या. असे त्यावेळी यांनी सांगितले. 
 

Web Title: Intervening Shiv Sena ministers should also resign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.