सुप्रिया सुळे यांनीच घेतल्या मुलाखती
By admin | Published: March 9, 2017 04:29 AM2017-03-09T04:29:05+5:302017-03-09T04:29:05+5:30
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने वाडेश्वर कटटयावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, भाजपाच्या महापौर पदाच्या उमेदवार मुक्ता टिळक, वाहतूक पोलीस उपायुक्त
पुणे : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने वाडेश्वर कटटयावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, भाजपाच्या महापौर पदाच्या उमेदवार मुक्ता टिळक, वाहतूक पोलीस उपायुक्त कल्पना बारावकर, जिल्हा सरकारी वकील उज्वला पवार, महापालिकेच्या मुख्य लेखापाल उल्का कळसकर, सुप्रिया दातार यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते. विविध विषयांवरच्या गप्पाटप्पा, चेष्टामस्करी यामुळे कार्यक्रम चांगलाच खुलला होता. विशेष म्हणजे सुप्रिया सुळे यांनी मुलाखत देतानाच हळूच माईक हातामध्ये घेऊन उपस्थित महिलांचा मुलाखती घेण्यास सुरूवात केल्याने यामध्ये आणखीनच रंगत आली.
वाडेश्वर कटटयावर विविध क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित करून त्यांच्याशी संवाद साधला जातो. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, श्रीकांत शिरोळे, गोपाळ चिंतल, सतीश देसाई यांच्याकडून याचे आयोजन केले जाते. महिला दिनाचे निमित्त साधून या कटटयावर राजकारण, समाजकारण, वकिली, प्रशासन, पोलीस आदी क्षेत्रातील महिलांना निमंत्रित करण्यात आले होते. भाजपाकडून मुक्ता टिळक यांना महापौर पदाची उमेदवारी निश्चित झाल्याचे समजल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी मुक्ता टिळक यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
नुकतीच झालेली
नुकतीच झालेली महापालिका निवडणुक, महिलांचे प्रश्न, उत्तरप्रदेश निवडणूक आदी विषयांवर गप्पा रंगल्या. लोकसभेत प्रश्न विचारणे, मुदद्ेसुद बोलणे, मतदारसंघातील प्रश्न मांडणे, चर्चेत भाग घेणे आदी मुददयांवर खासदारांच्या कामगिरीचे मुल्यांकन केले जाते. यामध्ये सुप्रिया सुळे यांनी चांगले मानांकन मिळविल्याबदद्ल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. वाडेश्वर कटटयावर सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक मान्यवर आल्याचे पाहून अनेकांना त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही.