राज ठाकरे घेणार इच्छुकांच्या मुलाखती
By admin | Published: July 17, 2017 04:25 AM2017-07-17T04:25:04+5:302017-07-17T04:25:04+5:30
सध्या मध्यवर्ती निवडणुकांचे वाहणारे वारे पाहता राज ठाकरे आॅगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात पुणे शहरात स्वत: येऊन महापालिकेच्या प्रभागनिहाय पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सध्या मध्यवर्ती निवडणुकांचे वाहणारे वारे पाहता राज ठाकरे आॅगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात पुणे शहरात स्वत: येऊन महापालिकेच्या प्रभागनिहाय पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करणार आहेत.
पुणे महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकात मनसेची वाताहत झाली आहे. २०१७ च्या निवडणुकात पक्षाला अवघ्या २ जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे महानगरपालिका निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वाताहत झाल्यानंतर तळापासून पुन्हा नव्याने पक्ष बांधणी करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे स्वत: संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती घेणार आहेत.
त्यासाठी आॅगस्टच्या दुसऱ्या आठवडयाचा मुहूर्त निश्चित करण्यात आला असून शहर पदाधिकारीपदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या
मुलाखती स्वत: ठाकरे घेणार
आहेत.
त्यानुसार, शहरातील पक्षाच्या नव्याने होणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या या महापालिकेच्या प्रभागनिहाय करण्यात येणार असून त्यासाठी प्रत्येक सदस्यांची मुलाखत घेऊन स्वत: ठाकरे या संदर्भातील नियुक्त्या करणार असल्याचे पक्षाचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी सांगितले आहे.