Pune Crime: दारुच्या नशेत दुचाकी धडकली, चालकासह डिलिव्हरी बॉयचा मृत्यू

By नम्रता फडणीस | Published: December 27, 2023 06:23 PM2023-12-27T18:23:47+5:302023-12-27T18:29:42+5:30

ही घटना भावडी रोड वाघोली येथे घडली...

Intoxicated bike collides, driver dies along with delivery boy pune crime news | Pune Crime: दारुच्या नशेत दुचाकी धडकली, चालकासह डिलिव्हरी बॉयचा मृत्यू

Pune Crime: दारुच्या नशेत दुचाकी धडकली, चालकासह डिलिव्हरी बॉयचा मृत्यू

पुणे : दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकी चालकासह डिलिव्हरी बॉयचा मृत्यू झाला. ही घटना भावडी रोड वाघोली येथे घडली.

याप्रकरणी पोलीस अंमलदार अमोल बबन गिरमे यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मयत राहुल मोहन डुकळे (वय-१९, रा. गायरान, गोरेवस्ती) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत डिलिव्हरी बॉय रावसाहेब सिद्धाजी माने (वय २१, रा. रामनगर, लोणीकंद) याचा मृत्यू झाला. ही घटना २५ डिसेंबर रोजी रात्री १० च्या दरम्यान घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, राहुल डूकळे आणि त्याचा सहकारी दारू पिऊन भरधाव वेगात दुचाकी चालवत होते. यावेळी डुकळेच्या दुचाकीने पिझ्झा डिलिव्हरी करणाऱ्या रावसाहेब मानेच्या दुचाकीला जोरदार् धडक दिली. यात राहुल डुकळे आणि रावसाहेब माने यांचा मृत्यू झाला तर डुकळेच्या पाठीमागे बसलेल्या तरुण किरकोळ जखमी झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक व्ही. एस. केदार करत आहेत.

Web Title: Intoxicated bike collides, driver dies along with delivery boy pune crime news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.