जनहित का ठेकेदाराचे हित? : महापालिकेकडून करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 02:17 PM2019-07-31T14:17:00+5:302019-07-31T14:23:39+5:30

गेल्या सहा महिन्यांपासून नगररस्त्यावरील पदपथ तोडून पुन्हा नव्याने उभारण्याचे काम सुरू आहे...

intrest of Public or contractor? : Disposal of taxpayer money from municipal corporation | जनहित का ठेकेदाराचे हित? : महापालिकेकडून करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी

जनहित का ठेकेदाराचे हित? : महापालिकेकडून करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी

Next
ठळक मुद्देसुस्थितीतील पदपथ उध्वस्त खराडी बायपास ते चंदननगर दरम्यानचा उत्तम दर्जाचा पदपथ तोडून तो नवीन करण्याचा घाट

- विशाल दरगुडे - 
चंदननगर : कधी कधी महानगरपालिकेचे अधिकारी जनहिताची कामे करतात की ठेकेदाराची कामे करतात हेच कळत नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे, नगररस्त्यावर बायपास ते चंदननगर दरम्यान असलेला उत्तमदर्जाचा पदपथ तोडून पुन्हा नव्याने पदपथ तयार करण्याचे काम सुरू केले आहे. यापूर्वी नगररस्त्यावर जवळपास पदपथ पूर्ण करण्यात आलेले आहे. 
मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून नगररस्त्यावरील पदपथ तोडून पुन्हा नव्याने उभारण्याचे काम सुरू आहे.  विमाननगरपासून ते खुळेवाडी फाटा दरम्यान चांगले पदपथ सोडून पुन्हा नव्याने पदपथ तयार करण्यात आला आहे; मात्र ते गरज नसतानाही ही केवळ टक्केवारीसाठी हे अधिकारी ठेकेदारांचे भलं करण्यासाठी स्वत:चं भलं करण्यासाठी चांगले पदपथ तोडून पुन्हा नव्याने पदपथ तयार करून, जनतेच्या पैशांची उधळपट्टी करत आहे; मात्र जे केलं ते केलं मात्र पुन्हा पुण्याच्या दिशेने जाताना बायपास ते चंदननगर दरम्यान असलेला उत्तम दर्जाचा पदपथ सध्या तोडण्याचे काम जोरात सुरू आहे, हे करत असताना प्रश्न पडतो की, एवढे चांगले पदपथ हे अधिकारी का तोडत आहे, त्याचे उत्तर म्हणजे अधिकारी आणि ठेकेदार यांच्यातलं साटंलोटं असून ते सर्वसामान्यांच्या कररूपातून येणाऱ्या पैशाची उधळपट्टी करत आहे. 
 असे नगररस्त्यावर सातत्याने गेल्या वर्षभरात दिसून येत आहे. ही अतिशय गंभीर बाब असून याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे असून तसे न झाल्यास सातत्याने चांगली कामे ठेकेदारांसाठी पुन्हा तोडायची, ती पुन्हा करायची, पुन्हा तोडायची, पुन्हा करायची अशी परिस्थिती असून यावर कोणी अंकूश ठेवणार कि नाही ?
.......
अधिकारी ठेकेदारांसाठी काम करतात ?
नगररस्त्यावर खराडी बायपास ते चंदननगर दरम्यानचा उत्तम दर्जाचा पदपथ तोडून तो नवीन करण्याचा घाट घातला आहे, हे करत असताना प्रश्न असा पडतो की, या पदपथाचा अतिशय कमी  नागरिक वापर करत असताना त्याची कुठल्याही प्रकारची  झीज झाली नसताना तो का तोडत आहे, त्याचे उत्तर असे आहे की, अधिकाºयांसाठी हे जनहिताचे नसून, ते ठेकेदारहिताचे आहेत.
.......
पदपथ जुना झाला म्हणजे खराब झाला का ?
नगररस्त्यावर चांगले पदपथ तोडून नव्याने जर पदपथ तयार करायचे काम चालू असेल, तर काय समजावे, असा प्रश्न पडतो. नगररस्त्यावरील चांगले उत्तम दर्जाचे पदपथ असून, ते केवळ जुने झाले म्हणून खराब झाले, असा अर्थ लावून जर ते तोडले जात असतील, तर ते अतिशय चुकीचे असून याला महापालिकेचे अधिकारी जर असे करत असतील, तर नागरिकांच्या कररूपाच्या पैशाची उधळपट्टी आहे. असेच म्हणावे लागेल. कारण, एवढे चांगले पदपथ तोडून विनाकारण नवीन पदपथ तयार करून, जुन्या चांगल्या पदपथांवर केलेला खर्च वाया घालविला आहे.

Web Title: intrest of Public or contractor? : Disposal of taxpayer money from municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.