रेल्वेगाड्यात बायोटॉयलेट्स लावणार
By admin | Published: March 28, 2017 03:01 AM2017-03-28T03:01:34+5:302017-03-28T03:01:34+5:30
भारतातील सर्व रेल्वेगाड्यांमध्ये २०२१ ते २०२२ पर्यंत बायोटॉयलेटस लावण्यात येतील, असे रेल्वे मंत्रालयाकडून राष्ट्रीय हरित
पुणे : भारतातील सर्व रेल्वेगाड्यांमध्ये २०२१ ते २०२२ पर्यंत बायोटॉयलेटस लावण्यात येतील, असे रेल्वे मंत्रालयाकडून राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणासमोर सांगण्यात आले़
सहयोग ट्रस्टच्या ह्युमन राईटस अँड लॉ डिफेडर्न्स यात सामाजिक न्याय व मानवी हक्क या विषयावरील कामाचा प्रत्यक्ष अनुभव घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी केलेल्या संशोधनावर आधारित पर्यावरणहित याचिका अॅड़ असीम सरोदे यांच्या मदतीने दाखल केली आहे़ रेल्वे रुळांवर थेट मानवी विष्इा टाकली जाते, अशा भारतीय रेल्वेमधील संडास व्यवस्थेमुळे अनेक पर्यावरणीय समस्या निर्माण होत आहे़ त्यामुळे सर्व रेल्वेगाड्यांमध्ये बायो टॉयलेटस लावावीत अशी मागणी करणाऱ्या याचिकेची सुनावणी सध्या पुण्यातील राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणासमोर सुरु आहे़