पारवडीत आॅनलाइन सात-बाऱ्यावर चुकीच्या नोंदी
By admin | Published: October 6, 2016 03:46 AM2016-10-06T03:46:35+5:302016-10-06T03:46:35+5:30
येथील तलाठी कार्यालयात तीन महिन्यांपूर्वी आॅनलाईन सात-बारा सुरू करण्यात आला. मात्र, जमिनी व जमिनीवरील पिकांच्या नोंदी चुकीच्या पद्धतीने झाल्यामुळे शेतकऱ्यांची कर्जप्रकरणे
पारवडी : येथील तलाठी कार्यालयात तीन महिन्यांपूर्वी आॅनलाईन सात-बारा सुरू करण्यात आला. मात्र, जमिनी व जमिनीवरील पिकांच्या नोंदी चुकीच्या पद्धतीने झाल्यामुळे शेतकऱ्यांची कर्जप्रकरणे रखडली आहेत.
नोंदणी केल्यामुळे बँकेत कर्जपरकरणे करण्यासाठी गेले असता अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. याबाबत पारवडीचे तलाठी ए. वाय. सुरवसे यांच्याश्ी संपर्क साधला असता तो झाला नाही. याबाबत पारवडीचे उपसरपंच कुंडलिक गावडे यांनी आॅनलाईन सात-बारा तंत्रज्ञान हे चालू पीकपाणी नोंदी दाखवीत नसल्याने शेतकरी वर्गाला बँक कर्जपरकरणे करण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शासनाने या तंत्रज्ञानात बदल करून शेतीसह पिकांची माहितीसुद्धा आॅनलाईन करण्यात यावी, असे सांगितले. (वार्ताहर)