दावडीतील चार हजार नागरिकांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:10 AM2021-04-28T04:10:43+5:302021-04-28T04:10:43+5:30
दावडी गावात कोरोना वाढत असल्यामुळे ही साखळी तोडण्यासाठी दावडी गाव बंद करण्यात आले आहे. गावातील ४ हजार नागरिकांची तपासणी ...
दावडी गावात कोरोना वाढत असल्यामुळे ही साखळी तोडण्यासाठी दावडी गाव बंद करण्यात आले आहे. गावातील ४ हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली. ज्यांच्यामध्ये कोरोनाचे लक्षण दिसले त्यांची अँटीजेन चाचणी करण्यात आली. त्यासाठी महालक्ष्मी मंगल कार्यालयामध्ये आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. त्यामध्ये एकूण ६५ नागरिकांची अँटिजेन चाचणी करण्यात आली. त्यापैकी पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
या मोहिमेला गावातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. दरम्यान, खेड पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर, समर्थ फाउंडेशनचे अध्यक्ष विजयसिंह शिंदे पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी साधना वाघुले यांनी भेट दिली. या मोहिमेत प्रत्येक व्यक्तीचे तापमान, ऑक्सिजनचे प्रमाण यांची तपासणी करण्यात आली. या वेळी सरपंच संभाजी घारे, पोलीस पाटील आत्माराम डुंबरे पाटील, उपसरपंच राहुल कदम, ग्रामपंचायत सदस्य अनिल नेटके, संतोष सातपुते, पुष्पा होरे, राणी डुंबरे पाटील, धनश्री कान्हूरकर, माधुरी खेसे, संगीता मैंद, मेघना ववले, मारुती बोत्रे, ग्रामसेवक तानाजी इसवे, तलाठी सतीश शेळके, केंद्रप्रमुख संतोष मांजरे, आरोग्यसेविका कोतुरवर उपस्थित होते.
--
फोटो क्रमांक : २७दावडी माझे कुटुंब माझी जबाबदारी
फोटो ओळ: दावडी ( ता खेड ) येथे शेतावर जाऊन नागरिकांची तपासणी करण्यात आली.