वढूतील घटनेची चौकशी व्हावी! - मराठा क्रांती मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 03:38 AM2018-01-04T03:38:47+5:302018-01-04T03:49:16+5:30
वढू येथील घटनेची सखोल चौकशी करून त्याच्या मुळाशी असणाºयांवर कडक कारवाई करावी, यावरून झालेल्या हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाच्या कुटुंबीयांना सरकारने २५ लाख रुपयांची भरपाई द्यावी, अशा मागण्या करतानाच मराठा समाजाला शांतता राखण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे.
पुणे - वढू येथील घटनेची सखोल चौकशी करून त्याच्या मुळाशी असणाºयांवर कडक कारवाई करावी, यावरून झालेल्या हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाच्या कुटुंबीयांना सरकारने २५ लाख रुपयांची भरपाई द्यावी, अशा मागण्या करतानाच मराठा समाजाला शांतता राखण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे.
वढूतील घटनेनंतर दोन समाजांतील गट समोरासमोर उभे राहिल्याचे चित्र निर्माण झाले आहे. बुधवारी विविध संघटनांनी राज्यव्यापी बंद पुकारला होता. या पार्श्वभूमीवर, मराठा क्रांती मोर्चाची बैठक शिवाजीनगर येथे झाली. तीत मराठा समाजाला कायदा-सुव्यवस्था राखण्याबाबत आवाहन करणारा ठराव झाला. संघटनेचे शांताराम कुंजीर, राजेंद्र कोंढरे, धनंजय जाधव, तुषार काकडे या वेळी उपस्थित होते. वढू येथे उसळलेल्या संघर्षात शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई येथील एका तरुणाला जीव गमवावा लागला. कोरेगाव भीमा व नगर रस्त्यावरील नागरिकांच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
ग्रामस्थांनी पूर्वकल्पना देऊनही पोलीस प्रशासनाने योग्य खबरदारी घेतली नाही. अशा पोलीस अधिकाºयांवर कारवाई करावी, समाजमाध्यमांद्वारे तेढ निर्माण करणाºयांना अटकाव करावा, अशा मागण्या मोर्चाने केल्या.
सर्वांनीच राज्यघटनेचे पालन करावे, कायदा हातात घेऊ नये, शासकीय मालमत्तेचे नुकसान करू नये, असे आवाहन या वेळी करण्यात आले.
बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी हालअपेष्टा सोसणाºया क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी राज्यातील शाळा-महाविद्यालये
बंद राहिली, याचा खेद व्यक्त करण्यात आला.
यातील मृतांच्या वारसांना
२५ लाख रुपये द्यावेत आणि मालमत्तेची नुकसानभरपाई मिळावी, अशा मागण्या मराठा मोर्चाच्या वतीने करण्यात आल्या. दंगलखोरांना शोधून त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.