सल्ला डावलून छाप्यास निमंत्रण

By admin | Published: September 11, 2016 01:07 AM2016-09-11T01:07:12+5:302016-09-11T01:07:12+5:30

मुदतीत मालमत्ता घोषित करा, विशिष्ट शुल्क, दंड भरून या योजनेंतर्गत सवलतीचा फायदा उठवा, असा सल्ला आयकर विभागाचे आयुक्त गौरव बाथम यांनी दिला

Invitation to invoke advice | सल्ला डावलून छाप्यास निमंत्रण

सल्ला डावलून छाप्यास निमंत्रण

Next

पिंपरी : मुदतीत मालमत्ता घोषित करा, विशिष्ट शुल्क, दंड भरून या योजनेंतर्गत सवलतीचा फायदा उठवा, असा सल्ला आयकर विभागाचे आयुक्त गौरव बाथम यांनी दिला असताना त्याकडे काणाडोळा करणे उद्योजक, व्यावसायिकांच्या अंगलट आले आहे. उद्योजक, काही खासगी रुग्णालयांचे संचालक अशा सुमारे पाच हजार लोकांना आयकर विभागाच्या नोटीस पाठविल्या असल्याने त्यांचे धाबे दणाणले आहेत.
लघुउद्योजक संघटनेच्या पुढाकाराने जूनमध्ये उद्योजकांसाठी घेतलेल्या बैठकीत आयकर विभागाने उत्पन्न जाहीर योजनेची घोषणा केली होती. १ जून २०१६ ते ३० सप्टेंबर २०१६ या कालावधीत ही योजना जाहीर करून उद्योजक, व्यावसायिकांनी कायद्यातील तरतुदीचा लाभ घ्यावा, असा मोलाचा सल्ला दिला होता. दिलेल्या मुदतीत मालमत्ता घोषित करा, विशिष्ट शुल्क, दंड भरून या योजनेंतर्गत मिळणाऱ्या सवलतीचा फायदा उठवा, असे आयुक्त बाथम तसेच अधिकारी पंकज कुमार यांनी सांगितले होते. ही योजना १ जून २०१६ ते ३० सप्टेंबर २०१६ या काळासाठी लागू करण्यात आली असल्याचे नमूद करून ही योजना मालमत्तासंदर्भात अघोषित उत्पनाबद्दल आर्थिक वर्ष २०१५-१६ व त्यापूर्वीच्या वर्षासाठीही लागू आहे, असे स्पष्ट केले होते.
मालमत्तेचे बाजारमूल्य हे १ जून २०१६च्या अघोषित उत्पन्नाच्या ४५ टक्के असल्याचे स्पष्ट करून योजनेंतर्गत मालमत्ता घोषित केल्यास आर्थिक व्यवहारासंबंधीच्या कागदपत्रांची छाननी अथवा चौकशी होणार नाही. आयकर संपत्ती कायद्यानुसार खटला भरणार नाही. निनावी व्यवहार कायदा १९८८ या कायद्यातून सूट (काही अटी वगळून) या योजनेंतर्गत मालमत्ता संपत्ती १ जून २०१६ ते ३० सप्टेंबर २०१६ पर्यंत घोषित करावी लागेल. ३० नोव्हेंबर २०१६ पर्यंत कर, सरचार्ज, दंड भरावा लागेल, असे स्पष्ट केले असताना त्याकडे दुर्लक्ष केले. (प्रतिनिधी)

Web Title: Invitation to invoke advice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.