Invitation to President Draupadi Murmu: माऊलींच्या दर्शनाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 09:05 PM2022-08-10T21:05:20+5:302022-08-10T21:05:35+5:30

माऊलींच्या संजीवन समाधीच्या सप्तशतकोत्तर (७२५) रौप्य वर्षानिमित्त येत्या डिसेंबर महिन्यात आळंदीत माऊलींच्या दर्शनासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण

Invitation to President Draupadi Murmu to visit Mauli | Invitation to President Draupadi Murmu: माऊलींच्या दर्शनाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण

Invitation to President Draupadi Murmu: माऊलींच्या दर्शनाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण

Next

आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीतील संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्टने तमाम वारकरी संप्रदायाच्या वतीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची बुधवारी (दि.१०) राष्ट्रपती भवनात सदिच्छा भेट घेतली. माऊलींच्या संजीवन समाधीच्या सप्तशतकोत्तर (७२५) रौप्य वर्षानिमित्त येत्या डिसेंबर महिन्यात आळंदीत माऊलींच्या दर्शनासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण देण्यात आले आहे. 
                 
प्रारंभी संपूर्ण वारकरी संप्रदायाच्या वतीने देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांच्या हस्ते देशाच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना माऊलींची मूर्ती, गाथा व ज्ञानेश्वरी देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, योगी निरंजननाथ, उमेश महाराज बागडे आदी उपस्थित होते.
                
दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना वारकरी संप्रदायाचे महत्व, आषाढी पायीवारीची माहिती, माऊलींच्या समाधीची माहिती, देवस्थानच्या विविध प्रकल्पांची फोटोसह माहिती ट्रस्टच्या वतीने प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी दिली. सुमारे चाळीस मिनिटांच्या भेटीत राष्ट्रपती मुर्मू यांनी वारकरी संप्रदायाचा इतिहास जाणून घेतला. महाराष्ट्रातून तमाम वारकरी संप्रदायाच्या वतीने केलेला हा सन्मान म्हणजेच साक्षात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त झाला आहे अशी भावना यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केली.

Web Title: Invitation to President Draupadi Murmu to visit Mauli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.