रस्त्यावरील वाहनांमुळे वाहतूककोंडीला निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 12:19 AM2019-01-09T00:19:43+5:302019-01-09T00:20:05+5:30

मुंबई-पुणे महामार्ग : नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी

Invitation for traffic by road vehicles | रस्त्यावरील वाहनांमुळे वाहतूककोंडीला निमंत्रण

रस्त्यावरील वाहनांमुळे वाहतूककोंडीला निमंत्रण

Next

पिंपरी : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर लहान-मोठ्या वाहनांची येथे नेहमीच वर्दळ असते. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. येथे वांरवार वाहतूककोंडी होत असल्यामुळे प्रदूषणाचा व वाहतूककोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच वाहनचालक पदपथाचा वापर पार्किगसाठी करत आहेत. रिक्षाचालकही रस्त्यावर वाहने उभी करतात. वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
मुंबईकडे जाणाºया वाहनांचा ताण याच मार्गावर होत आहे. येथील रस्त्यात एकेरी वाहतूक करूनही वाहनचालक त्या नियमांचे पालन करीत नाहीत. अनेक वेळा वाहनचालक उलट दिशेने वाहने चालवितात. तसेच रस्त्यावरही रिक्षा उभ्या केल्या जातात. त्यामुळे तेथील चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते.

बीआरटीमुळे रस्ता अरुंद झाला आहे. त्यातच रिक्षा उभ्या केल्यामुळे वाहनचालकांना वाहन चालविताना दमछाक करावी लागत आहे. या ठिकाणी वाहतूक पोलीस असतात. परंतु नियमांचे उल्लघंन करणाºया रिक्षाचालकांकडे त्यांचे दुर्लक्ष होते. त्यामुळे नियमांचे उल्लघंन करणाºयांची संख्या वाढली आहे. तसेच अनेक दुचाकीस्वार रस्त्यावरच गाड्या पार्क करतात. त्यामुळे रस्ता अरुंद होतो.
इंदिरा गांधी उड्डाणपुलाकडून येणारे वाहनचालक विरोध दिशेने वाहने हाकतात. त्यामुळे वाहनचालकांना अंदाज येत
नाही. त्यामुळे किरकोळ अपघातही वारंवार होत आहेत. नियमांचे उल्लघंन करणाºयावर कारवाईची मागणी होत आहे.
 

Web Title: Invitation for traffic by road vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.