मुलांमध्ये संस्कार घडवण्यासाठी सहभागी करून घ्या : मांढरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:11 AM2021-09-19T04:11:37+5:302021-09-19T04:11:37+5:30

कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे अचानक मित्र मंडळ व गजानन मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने व ग्रामपंचायत महिला सदस्यांनी ...

Involve children to cultivate: Mandhare | मुलांमध्ये संस्कार घडवण्यासाठी सहभागी करून घ्या : मांढरे

मुलांमध्ये संस्कार घडवण्यासाठी सहभागी करून घ्या : मांढरे

Next

कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे अचानक मित्र मंडळ व गजानन मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने व ग्रामपंचायत महिला सदस्यांनी एकत्रित येत सामूहिक अथर्वशीर्ष पठण कार्यक्रम घेतला. यावेळी जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे, ग्राम पंचायत सदस्य रेखा तानाजी ढेरंगे, वंदना गव्हाणे, जयश्री गव्हाणे, माजी ग्राम पंचायत सदस्य अंजली ढेरंगे , महिला दक्षता समिती सदस्य हेमलता भांडवलकर, रोहिणी गव्हाणे, संगीता ढेरंगे, मांझिरे ताई , जंगमताई , माजी सरपंच विजय गव्हाणे, सहायक फौजदार अविनाश थोरात, शहाजी ढेरंगे, अरविंद गव्हाणे, अण्णा काशीद, बबलू शिंदे , अशोक कारंडे, भाऊसाहेब ढेरंगे यांनी विशेष सहकार्य केले. कोरेगाव भीमा येथील लिंब चौकात अथर्वशीर्ष व गणपती स्तोत्र पठण करण्यासाठी महिलांनी मोठा प्रतिसाद दिला.

या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणावर ती महिला भगिनींनी सहभाग नोंदविला आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षापासून नागरिकांच्या मनावरती भीतीचे वातावरण असून नागरिकांच्या कुटुंबामध्ये आनंदी वातावरण राहण्यासाठी या अथर्वशीर्षाचे पठण करण्यात आल्याची माहिती वंदना गव्हाणे व रेखा ढेरंगे यांनी दिली.

१८ कोरेगाव भीमा

अथर्वशीर्ष पठण करताना कोरेगाव भीमा येथील महिला.

180921\20210918_112542-01.jpeg

फोटो ओळ - अथर्वशीर्ष पठण करताना कोरेगाव भिमा येथील महिला

Web Title: Involve children to cultivate: Mandhare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.