आयपीएस अधिकारी कृष्ण प्रकाश शरद पवारांच्या भेटीला; बारामतीत गोविंदबागेत जाऊन घेतली भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2022 01:54 PM2022-04-23T13:54:30+5:302022-04-23T14:26:14+5:30

या भेटीबाबत कृष्ण प्रकाश यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला...

IPS officer Krishna Prakash meets Sharad Pawar Visited Govindbagh in Baramati | आयपीएस अधिकारी कृष्ण प्रकाश शरद पवारांच्या भेटीला; बारामतीत गोविंदबागेत जाऊन घेतली भेट

आयपीएस अधिकारी कृष्ण प्रकाश शरद पवारांच्या भेटीला; बारामतीत गोविंदबागेत जाऊन घेतली भेट

Next

बारामती (पुणे) : चार दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवडहून बदली झालेले पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश (ips krushna prakash) यांनी शनिवारी (दि. २३) सकाळी बारामतीत गोविंदबाग येथे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार (sharad pawar) यांची भेट घेतली. मात्र, भेटीनंतर कृष्ण प्रकाश ‘ये मेरी खासगी मुलाकात थी’ असे सांगत माध्यमांशी बोलण्यास नकार दिला.

आयर्नमॅन अशी ओळख असलेल्या कृष्ण प्रकाश यांची बुधवारी(दि २०) मुंबईत विशेष पोलीस महानिरीक्षक व्हीआयपी सुरक्षा येथे बदली झाली. त्यांच्या जागी मुंबई येथील सुधार सेवाचे विशेष पोलिस महानिरीक्षक अंकुश शिंदे यांनी तात्काळ पदभारही स्वीकारला आहे. बदलीच्या काळात कृष्ण प्रकाश हे रजेवर होते. रजा संपल्यानंतर त्यांनी माघारी येताच ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे.

कृष्ण प्रकाश यांची अवघ्या दीड वर्षात त्यांची बदली झाली आहे. गृहखाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. त्यामुळे प्रकाश यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असणाऱ्या पवार यांची भेट घेतल्याचे मानले जाते. कृष्ण प्रकार बाहेर पडताच या भेटीनंतर पवार देखील कोल्हापूरच्या नियोजित संकल्प यात्रेठी निघून गेले. तसेच पवार यांनी देखील माध्यमांना आज मला भरपूर कामे आहेत, असे म्हणत त्यांनी माध्यमांशी बोलणे टाळले.

Web Title: IPS officer Krishna Prakash meets Sharad Pawar Visited Govindbagh in Baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.