Maharashtra | राज्यातील ५ पोलीस अधिकाऱ्यांना 'आयपीएस'चा दर्जा

By विवेक भुसे | Published: October 17, 2022 08:15 PM2022-10-17T20:15:35+5:302022-10-17T20:17:23+5:30

हे पाचही अधिकारी २००३ च्या बॅचचे अधिकारी आहेत...

IPS rank to 5 police officers in the maharashtra police pune latest news | Maharashtra | राज्यातील ५ पोलीस अधिकाऱ्यांना 'आयपीएस'चा दर्जा

Maharashtra | राज्यातील ५ पोलीस अधिकाऱ्यांना 'आयपीएस'चा दर्जा

Next

पुणे : भारतीय पोलीस सेवेत (आयपीएस) या वर्षी महाराष्ट्र संवर्गातून पाच अधिकाऱ्यांची निवड झाली आहे. महाराष्ट्र लाेकसेवा आयाेगाच्या २००३ च्या बॅचचे हे अधिकारी आहेत. श्रीकांत धिवरे (पोलीस अधीक्षक, सीआयडी पुणे), प्रकाश जाधव (पाेलीस उपायुक्त, मुंबई शहर), विनय राठोड (पाेलीस उपायुक्त, ठाणे शहर), अश्विनी सानप (पोलीस अधीक्षक, सिक्युरिटी कॉर्पोरेशन) आणि रश्मी करंदीकर ( पोलीस अधीक्षक, नागरी संरक्षण) यांना आयपीएस दर्जा मिळाला आहे. हे पाचही अधिकारी २००३ च्या बॅचचे अधिकारी आहेत.

केंद्रीय गृह मंत्रालयाने याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. एमपीएससीतून उपअधीक्षकपदी नियुक्ती झालेल्या अधिकाऱ्यांना सुमारे दोन दशकांच्या सेवेनंतर त्यांच्या सेवा ज्येष्ठतेनुसार आयपीएसचा दर्जा मिळतो. निवड झालेल्या या अधिकाऱ्यांना राष्ट्रीय पोलीस अकादमीमध्ये काही महिन्यांसाठी आयपीएस प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे. त्यानंतर ते पुढील सेवेत रुजू होणार आहेत.

Web Title: IPS rank to 5 police officers in the maharashtra police pune latest news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.