लोखंडी दरवाजा ते थोरवेवस्तीपर्यंतचा पानंद रस्ता खुला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:20 AM2021-02-18T04:20:30+5:302021-02-18T04:20:30+5:30
शेलपिंपळगाव : शेलपिंपळगाव (ता. खेड) येथे पालकमंत्री शेतरस्ता योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेती प्रयोजनार्थ शेतरस्ता करण्यासाठी लोखंडी दरवाजा ते थोरवेवस्तीपर्यंतचा १५ ...
शेलपिंपळगाव : शेलपिंपळगाव (ता. खेड) येथे पालकमंत्री शेतरस्ता योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेती प्रयोजनार्थ शेतरस्ता करण्यासाठी लोखंडी दरवाजा ते थोरवेवस्तीपर्यंतचा १५ फूट रुंदीचा आणि ८०० मीटर लांबीचा पानंद रस्ता खुला करण्यात आला आहे. या शेतरस्त्याच्या कामाचे भूमिपूजन उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण, सरपंच विद्या मोहिते, युवा नेते मयूर मोहिते व ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले. यामुळे संबंधित शेतकऱ्यांचा शेती वापरासाठी आवश्यक असलेल्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
लोखंडी दरवाजा ते थोरवेवस्ती परिसरातील पानंद रस्ता मागील अनेक वर्षांपासून वापराविना बंद होता. परिणामी, येथील स्थानिक शेतकऱ्यांना शेतमाल दळणवळण करताना अडचण निर्माण होत होती.
या पार्श्वभूमीवर आमदार दिलीप मोहिते- पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच विद्या मोहिते व संबंधित शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन हा रस्ता खुला वापरासाठी खुला करण्यास सहमती दर्शविली. त्यानुसार बुधवारी (दि.१७) उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण यांनी रस्त्याची पाहणी करत रस्त्याच्या कामास अधिकृत सुरुवात करून दिली.
याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सयाजीराजे मोहिते, ग्रामपंचायत सदस्य संदीप मोहिते, सूर्यकांत इंगळे, वैभव मोहिते, निखिल मोहिते, माजी सरपंच वामनराव लांडे, ग्रामपंचायत सदस्य सीताराम गुजर, मंडल अधिकारी विजय घुगे, तलाठी राहुल पाटील, एम. एम. चोरमले, व्ही.एस. झेंडे, एस. जी. विटे, एस. व्ही. शेळके, सुहास मोहिते, ज्ञानेश्वर मोहिते, वामन मोहिते, राजेंद्र कोळी, संतोष महामुनी, गोकुळ दौंडकर आदिंसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
सदर रस्त्याचा १४५ शेतकऱ्यांना लाभ होणार असून सुमारे ८० एकर शेतीतून शेतमाल ने - आण करण्यास सोयीस्कर होणार आहे. तसेच ६० कुटुंबास मुख्य रस्त्यावर येणे जाणेची सोय होणार आहे.
१७ शेलपिंपळगाव
शेलपिंपळगाव (ता. खेड) येथील लोखंडी दरवाजा ते थोरवेवस्ती पानंद रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करताना मान्यवर.