Pune Crime: नवरा बायकोच्या भांडणात पडल्याने डोक्यात घातला लोखंडी रॉड, वाघोलीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2023 19:41 IST2023-10-03T19:40:31+5:302023-10-03T19:41:12+5:30
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही मूळचे छत्तीसगड येथील राहणारे आहेत....

Pune Crime: नवरा बायकोच्या भांडणात पडल्याने डोक्यात घातला लोखंडी रॉड, वाघोलीतील घटना
वाघोली (पुणे) : नवरा बायकोच्या भांडणामध्ये पडल्यामुळे रागावलेल्या नवऱ्याने तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना वाघोलीतील केसनंद फाटा येथील संत तुकारामनगर येथे घडली. लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नेत्रकुमार परदेस निषाद (वय ३७, रा. केसनंद फाटा, वाघोली) यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मुरली जेठुराम निषाद (वय ३३, रा़ केसनंद फाटा, वाघोली) याला अटक केली आहे. या घटनेत तुळशीराम (वय ४०) हा गंभीर जखमी झाला असून अद्याप बेशुद्ध असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही मूळचे छत्तीसगड येथील राहणारे आहेत.
ते बांधकामाच्या ठिकाणी बिगारी काम करतात. तेथेच पार्किंगमध्ये राहत आहेत. तुळशीराम हाही तेथेच राहातो. मुरली निषाद व त्याच्या बायकोमध्ये सकाळी भांडणे सुरु होती. यामध्ये तुळशीराम पडला. याचा मुरली याला राग आल्याने तेथेच पडलेला लोखंडी रॉड घेऊन त्याने तुळशीराम याच्या डोक्यात घातला. त्यामुळे मोठा रक्तस्त्राव होऊन तुळशीराम हा बेशुद्ध पडला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. लोणीकंद पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.