हा साहित्यिक आहे का, विचारणारेच सुमार दर्जाचे; नियोजित संमेलनाध्यक्ष शोभणे यांचा पलटवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2023 07:52 AM2023-07-07T07:52:34+5:302023-07-07T07:53:00+5:30

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने गुरुवारी शोभणे यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

Is this literary, the only ones who ask are of moderate quality; Planned meeting president Sobhane's counterattack | हा साहित्यिक आहे का, विचारणारेच सुमार दर्जाचे; नियोजित संमेलनाध्यक्ष शोभणे यांचा पलटवार

हा साहित्यिक आहे का, विचारणारेच सुमार दर्जाचे; नियोजित संमेलनाध्यक्ष शोभणे यांचा पलटवार

googlenewsNext

पुणे : साहित्यात आपण जात-धर्माच्या पलीकडे जाऊन विचार करायला हवा; पण आपण पुन्हा त्यात अडकून पडतोय का? हा प्रश्न डोक्याला झिणझिण्या आणतो आहे. माझी निवड झाल्यावर विचारले गेले की, रवींद्र शोभणे हा साहित्यिक आहे का? ज्यांनी असे प्रश्न विचारले, ते खरं तर सुमारच आहेत, त्यांनी प्रश्न विचारावेत, त्यांनाही अधिकार आहे, असा पलटवार अमळनेर येथील नियाेजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रवींद्र शोभणे यांनी केला.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने गुरुवारी शोभणे यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. शोभणे पुढे म्हणाले, भारतीय समाजव्यवस्थेमध्ये जगत असताना आपण एकाकी जगत नाही. आपल्याभोवती अनेक प्रश्न, जात-धर्म असतात. त्यातून साहित्यिक सत्त्व शोधत असतो. पूर्वीच्या लेखकांचे लेखन पाहून दडपण येते; कारण त्यांचे लेखन ५० वर्षांनंतरही वाचले जाते. आमचे वाचले गेले तर आम्ही चांगले साहित्यिक बनू.

... असे बोलणे योग्य नाही
दया पवार, शिवाजी सावंत या निवडणुकीच्या धावपळीत गेले. इंदिरा संत या अध्यक्षपदापासून दूर राहिल्या. त्यामुळे अध्यक्षपदाची निवड करण्याची पद्धत सुरू केली, ती योग्य आहे; पण निवड झाल्यावर ‘हा लेखक सुमार आहे...’ असे बोलले जाते. हे काही योग्य नाही. ज्यांना अशी निवड मान्य नाही, तेच असे बोलत आहेत, असेही शोभणे म्हणाले.

Web Title: Is this literary, the only ones who ask are of moderate quality; Planned meeting president Sobhane's counterattack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.