तरुणांची माथी भडकवणारा इसिस संबंधित डाॅक्टर जेरबंद;एनआयएची पुण्यात माेठी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 04:51 AM2023-07-28T04:51:31+5:302023-07-28T04:52:19+5:30

अनेक दस्तावेज जप्त

Isis-related doctor jailed for inciting youth | तरुणांची माथी भडकवणारा इसिस संबंधित डाॅक्टर जेरबंद;एनआयएची पुण्यात माेठी कारवाई

तरुणांची माथी भडकवणारा इसिस संबंधित डाॅक्टर जेरबंद;एनआयएची पुण्यात माेठी कारवाई

googlenewsNext

पुणे : इसिस महाराष्ट्र मॉड्युल प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) प्रतिबंधित दहशतवादी संघटनेच्या एका डॉक्टरला कोंढव्यातून अटक केली. या प्रकरणातील ही पाचवी कारवाई आहे. डॉ. अदनानली सरकार (४३) असे त्याचे नाव आहे. त्याच्या कोंढव्यातील घरात इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आणि ‘इसिस’शी संबंधित अनेक दस्तावेज जप्त करण्यात आले आहेत. त्याद्वारे डॉ. सरकार हा तरुणांना प्रेरित करून संघटनेत भरती करीत असल्याचे उघड झाले.
‘एनआयए’च्या तपासानुसार, डॉ. सरकार हा देशाची शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करत होता. पुण्यात एका इंजिनीअरला अटक केल्यानंतर एनआयएने मुंबई, ठाणे आणि पुणे येथे शोधमोहीम राबवली. 

त्यानुसार ३ जुलै रोजी एनआयएने इतर चार जणांना मुंबईत अटक केली होती. मुंबईतील तबिश नासेर सिद्दिकी, पुण्यातील जुबेर नूर मोहम्मद शेख, अबू नुसैबा आणि ठाण्यातील शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला अशी त्यांची नावे आहेत.

२ तरुणीही रडारवर

दोन दहशतवाद्यांच्या अटकेनंतर ‘अल सफा’च्या रतलाम मॉड्युलचा पर्दाफाश झाला असून, तिसरा आरोपीही पकडला गेला आहे. यात आणखी सहा आरोपी ‘अल सफा’च्या रतलाम मॉड्युलमध्ये सक्रिय असल्याचे एटीएसच्या तपासात उघड झाले आहे. यात दोन मुलींचाही समावेश आहे. त्यातील एक जामिया मिलियाची विद्यार्थिनी असलेली महिलाही एटीएसच्या रडारवर असल्याचे समजते.

कोण आहे कादीर?

अब्दुल कादीर दस्तगीर पठाणचा ग्राफिक्स डिझाईनचा व्यवसाय आहे. त्याने मोहम्मद खान आणि मोहम्मद साकी यांना काम देतो, असे सांगितले आणि त्यांना महिन्याला आठ हजार रुपये पगार दिला. तसेच, एक खोली राहायला दिली. 

रत्नागिरी/गोंदिया :  काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी दहशतवादी कटात सहभागी असल्याप्रकरणी दोघांना अटक केली होती. त्यानंतर या प्रकरणी दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) रत्नागिरीतून एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले, तर दहशतवाद्यांना आश्रय दिल्याप्रकरणी गोंदियातून एकाला अटक केली होती. हा युवकही दहशतवादी कृत्यात सहभागी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

संशयित दहशतवाद्यांच्या चौकशीतून काही नावे समोर आली आहेत. दहशतवादी कारवाईत रत्नागिरीतील एकाचा समावेश असल्याची माहिती एटीएसला  मिळाल्यानंतर पोलिसांनी रत्नागिरीतून एकाला ताब्यात घेतले. पुण्यात अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांना आसरा देणाऱ्या एका युवकाला गोंदियातून तीन दिवसांपूर्वी अटक केली होती. मूळ गोंदियाचा असलेल्या अब्दुल कादीर पठाण (३५) याने दहशतवाद्यांना पुणे येथे आश्रय दिला हाेता.

Web Title: Isis-related doctor jailed for inciting youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.