संभाजी भिडेंचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, 'इस्लाम हाच खरा आपल्या देशाचा शत्रू...'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2022 04:01 PM2022-03-18T16:01:55+5:302022-03-18T16:03:24+5:30

या वक्तव्याने पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडले आहे...

islam is the real enemy of our country said sambhaji bhide controversial statement in pune | संभाजी भिडेंचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, 'इस्लाम हाच खरा आपल्या देशाचा शत्रू...'

संभाजी भिडेंचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, 'इस्लाम हाच खरा आपल्या देशाचा शत्रू...'

googlenewsNext

पुणे: भिडे गुरूजी नावाने ओळखले जाणारे शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संभाजी भिडे यांनी आता पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांनी हे विधान पुण्यात बोलताना केले आहे. भिडे म्हणाले, इस्लाम हाच खरा आपल्या देशाचा शत्रू आहे. संभाजी भिडे यांच्या या वक्तव्याने पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडले आहे.

काय म्हणाले संभाजी भिडे-

आज औरंगजेब नसला तरी बांगलादेश, पाकिस्तान आणि मुसलमानांच्या रूपाने तो शिल्लक आहे. आता झालं गेलं विसरून जाऊया, नवीन जगासोबत चालूया अस म्हणणारी वृत्ती सुशिक्षीत लोकांत फार मोठ्या प्रमाणात आहे. हेच आपल्या देशाचं दुर्दैव आहे असं वक्तव्य संभाजी भिडेंनी केले आहे.

पुढे बोलताना संभाजी भिडे म्हणाले, संभाजी महाराजांनी औरंगजेबाला शरण न जाता देशाभिमान न सोडता ऐन तारुण्यात मरण पत्करलं. पण संभाजी महाराजांनी इस्लाम पत्करला नाही. याच कारणाने औरंगजेबाने संभाजी महाराजांची हत्या केली.

संभाजी भिडे म्हणाले, इस्लाम आपल्या देशाचा खरा शत्रू आहे. तो अनेक रुपात गावोगावी तो नांदतोय. संभाजी महाराजांना श्रद्धांजली वाहून इस्लामला उत्तर देण्याची ताकद आपण मिळवली पाहिजे.

Web Title: islam is the real enemy of our country said sambhaji bhide controversial statement in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.