विमान प्रवाशांचे विलगीकरण आता घरी; परदेशातून निघतानाच करायची तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 03:21 AM2020-08-15T03:21:55+5:302020-08-15T03:22:11+5:30

विमान प्रवाशांनी परदेशातून प्रवासाला निघतानाच कोविड चाचणी करून घ्यायची आहे. ती निगेटिव्ह असेल तरच त्यांना प्रवास करता येईल.

Isolation of air passengers now at home | विमान प्रवाशांचे विलगीकरण आता घरी; परदेशातून निघतानाच करायची तपासणी

विमान प्रवाशांचे विलगीकरण आता घरी; परदेशातून निघतानाच करायची तपासणी

Next

पुणे : कोरोनामुळे अनेक भारतीय परदेशात अडकले आहेत. या भारतीयांना परत मायदेशी आणण्यासाठी ‘वंदे भारत’ ही विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत भारतात परतणाऱ्या प्रवाशांसाठी बंधनकारक केलेले १४ दिवसांचे ‘हॉटेल क्वारंटाइन’ (विलगीकरण) बंद करण्यात आले आहे. त्याऐवजी त्यांना घरीच विलगीकरण पाळण्याची मुभा दिली आहे.

यासाठी विमान प्रवाशांनी परदेशातून प्रवासाला निघतानाच कोविड चाचणी करून घ्यायची आहे. ती निगेटिव्ह असेल तरच त्यांना प्रवास करता येईल. ही माहिती तिथूनच त्यांनी खास पोर्टलवर अपडेट करायची आहे. या माहितीची तपासणी भारतातील विमानतळावर केली जाईल. त्या माहितीची खातरजमा केल्यावर विमानतळावरून त्यांंना घरी क्वारंटाइन होण्याची परवानगी दिली जाणार आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

लोहगाव विमानतळावरही याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. विमानतळाचे समन्वय अधिकारी अशोक घोरपडे यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, विमानतळावर रोज दोन ते अडीच हजार प्रवासी परदेशातून व भारतातून पुण्यात येतात. परदेशातून थेट पुण्यात कमी फ्लाईट आहेत.

दिल्ली, मुंबईत उतरणारे आणि तिथून पुण्यात येणाऱ्यांची संख्या बरीच आहे. केंद्र सरकारने नव्याने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार १० वर्षे वयाखालील मुले-मुली तसेच वृद्ध व्यक्ती बरोबर असल्यास त्यांना होम क्वारंटाइन होण्यास सांगितले आहे. यासाठी महापालिकेचे काही कर्मचारी विमानतळावर
नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून प्रवाशांच्या नोंदी, तपासणी अहवाल पाहणे, तो योग्य ठिकाणी पाहणे ही कामे केली जातात.

विमान प्रवाशांवर ‘वॉच’
घरीच विलगीकरणाची परवानगी दिलेल्या विमान प्रवाशांची दूरध्वनी, मोबाइल क्रमांकासह नाव, पत्ता अशी सर्व माहिती पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे दिली जाते. तिथून या प्रवाशांची दर दोन-तीन दिवसांनी माहिती घेतली जाते. - अशोक घोरपडे, समन्वयक, लोहगाव विमानतळ

Web Title: Isolation of air passengers now at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.