धरणातील पाणीगळतीचा प्रश्न आठवडाभरात निकाली निघणार
By admin | Published: April 25, 2016 02:49 AM2016-04-25T02:49:05+5:302016-04-25T02:49:05+5:30
खडकवासला धरण ते पर्वती जलकेंद्रापर्यंत कॅनॉलने पाणी वाहून येताना मोठ्या प्रमाणात होणारी पाणीगळती येत्या आठवडाभरात निकाली निघणार आहे.
पुणे : खडकवासला धरण ते पर्वती जलकेंद्रापर्यंत कॅनॉलने पाणी वाहून येताना मोठ्या प्रमाणात होणारी पाणीगळती येत्या आठवडाभरात निकाली निघणार आहे.
खडकवासला धरण ते पर्वती जलकेंद्रापर्यंतच्या बंद पाइपलाइनचे काम पूर्ण झाले असून येत्या आठवडाभरात त्याचे उद्घाटन होणार आहे. त्यामुळे पाणीगळतीचा प्रश्न निकाली निघणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
कालवा समितीच्या शनिवारी झालेल्या बैठकीमध्ये खडकवासला धरण ते पर्वती जलकेंद्रापर्यंतच्या कॅनॉलमधून होणाऱ्या पाणीगळतीवर पालकमंत्री गिरीश बापट यांनी तीव्र चिंता व्यक्त केली होती. मात्र पाणीगळतीचा हा प्रश्न केवळ आठवडाभरात निकाली निघणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महापौर प्रशांत जगताप यांनी सांगितले, ‘‘येत्या आठवडाभरात बंद पाइपलाइनचे उद्घाटन होणार आहे, त्यानंतर कालव्याच्या पाणी गळतीची दुरुस्ती पालिका प्रशासनाकडून तातडीने हाती घेतली जाईल.’’
- कालवा झिरपण्याचे प्रमाण वाढले /७