आला रे आला! मॉन्सून बंगालच्या उपसागरात दाखल; यंदा ४ जूनला भारतात येण्याचा अंदाज

By नितीन चौधरी | Published: May 31, 2023 04:39 PM2023-05-31T16:39:47+5:302023-05-31T16:40:15+5:30

एल निनोच्या पार्श्वभुमीवर मॉन्सून आठ दिवस उशिराने बंगालच्या उपसागरात दाखल

It came it came Monsoon enters Bay of Bengal It is expected to arrive in India on June 4 this year | आला रे आला! मॉन्सून बंगालच्या उपसागरात दाखल; यंदा ४ जूनला भारतात येण्याचा अंदाज

आला रे आला! मॉन्सून बंगालच्या उपसागरात दाखल; यंदा ४ जूनला भारतात येण्याचा अंदाज

googlenewsNext

पुणे : एल निनोच्या पार्श्वभुमीवर मॉन्सून तब्बल आठ दिवस उशीराने बंगालच्या उपसागरात दाखल झाला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत मॉन्सून मालदीव बेटे, कौमारिन क्षेत्र व बंगालच्या उपसागरातील काही भाग व अरबी समुद्रातील काही भागांत दाखल होण्यासाठी अनुकुल स्थिती असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे. 

मॉन्सूनने मंग‌ळवारी (दि. ३०) अंदमानच्या सागरात धडक दिली होती. त्यानंतर तीन दिवसांत त्याचा प्रवास बंगालच्या उपसागरात होण्याचा अंदाज होता. मात्र, या अंदाजाला छेद देत मॉन्सूनने वेगाने प्रगती करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे मॉन्सून आता बंगालच्या उपसागरात दाखल झाला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत त्याची आणखी प्रगती अपेक्षित असून तो अरबी समुद्रातील काही भागात दाखल होणार आहे. अरबी समुद्राकडील बाजुने मॉन्सून केरळमधून भारतभुमीवर दाखल होतो. यंदा मॉन्सून ४ जून रोजी दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने यापूर्वीच जाहीर केला आहे.

Web Title: It came it came Monsoon enters Bay of Bengal It is expected to arrive in India on June 4 this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.