चौकशी करणे हा केंद्र सरकारचा अधिकार आहे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 05:25 PM2020-01-25T17:25:46+5:302020-01-25T17:29:10+5:30
देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले जातात मात्र या सर्वांची केंद्र सरकारने चौकशी करणे आवश्यक आहे. तो केंद्राचा अधिकार असून त्यात काहीच चूक नाही अशा शब्दात भाजप प्रवेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.
पुणे : सध्या राज्यसरकारचा रोज नवा कल्पनाविलास सुरु आहे. रोज नवीन काहीतरी बाहेर काढतात. पण कशाचाच शोध लावत नाहीत, चौकशी करीत नाहीत, निष्कर्ष काढत नाहीत. त्यात देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले जातात मात्र या सर्वांची केंद्र सरकारने चौकशी करणे आवश्यक आहे. तो केंद्राचा अधिकार असून त्यात काहीच चूक नाही अशा शब्दात भाजप प्रवेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.
ते पुण्यात त्याच्या कोथरूड मतदारसंघात एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले की, ' कधी फोन टॅपिंग तर कधी भीमा कोरेगाव दंगलीत देवेंद्र फडणवीस यांच्या हात होता, असा रोज कल्पनाशक्तीचा विलास सुरू आहे. अजून काही यादी असेल तर तीही काढा, या सर्वांची चौकशी करा. चौकशी करणे हा केंद्र सरकारचा अधिकार आहे, यात काहीही चुकीचं नाही.त्यामुळे फक्त आरोप करणं चुकीचं आहे. हळूहळू लोकं या बातम्या वाचणेच बंद करतील असेही ते म्हणाले.
यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजच्या स्मारकाच्या कामाविषयीही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, ' स्मारकासंदर्भात कॅगने ठपका ठेवला तर चौकशी करा. पण स्मारकाचं कामकाज लांबवू नका.चौकशी करा, अहवाल आणा मात्र वर्षानुवर्षे चौकशी सुरू असल्याचे सांगून वातावरण नये असा सल्लाही त्यांनी दिला.