रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या आरोपींच्या नातेवाईकांकडून 'पार्टी' घेणे महागात ; उपनिरीक्षकाचे निलंबन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2021 12:20 AM2021-04-25T00:20:06+5:302021-04-25T00:23:07+5:30

मद्यपानानंतर अल्पवयीन मुलीशी अश्लिल वर्तन.....

It is expensive to have a 'party' from the relatives of the accused who are black-marketing Remdesiver injections; Suspension of sub-inspector | रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या आरोपींच्या नातेवाईकांकडून 'पार्टी' घेणे महागात ; उपनिरीक्षकाचे निलंबन

रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या आरोपींच्या नातेवाईकांकडून 'पार्टी' घेणे महागात ; उपनिरीक्षकाचे निलंबन

Next

पुणे : रेमडेसिविरचा काळा बाजार करुन जादा दराने विक्री केल्याप्रकरणात पकडलेल्या आरोपींच्या नातेवाईकांकडून पार्टी घेऊन या पार्टीत अल्पवयीन मुलीशी अश्लिल वर्तन गुन्हे शाखेच्या एका पोलीस उपनिरीक्षकाने केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

दीपक माने असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून त्याला तातडीने निलंबित करण्यात आले आहे.

माने हा गुन्हे शाखेच्या युनिट ४ मध्ये सध्या कार्यरत होता. पोलीस आयुक्तांनी रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी १० पथके तयार केली आहेत. गुन्हे शाखेच्या युनिट ४ ने बालेवाडी परिसरात दोघा भावांना इंजेक्शनसह पकडले होते. तपासादरम्यान, माने याची आरोपीच्या नातेवाईकांशी ओळख झाली. माने हा २० एप्रिल रोजी आरोपींच्या नातेवाईकांच्या घरी पार्टी करण्यासाठी गेला होता. त्या ठिकाणी त्याने मद्यपान केले. मद्यधुंद अवस्थेत त्याने या नातेवाईकांच्या लहान मुलीबरोबर अश्लिल वर्तन करुन तिची छेडछाड केली. तसेच सर्वांना आरोपी करतो, अशी धमकी दिली.

याबाबत एका महिलेने वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांकडे तक्रार केली. या तक्रारीची गंभीर दखल घेऊन चौकशी केली. त्यात तथ्य आढळून आल्याने दीपक माने याला तातडीने निलंबित करण्यात आले आहे. माने यांची खात्याअंतर्गत चौकशी सुरु करण्यात आली आहे.

Web Title: It is expensive to have a 'party' from the relatives of the accused who are black-marketing Remdesiver injections; Suspension of sub-inspector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.