Raj Thackeray: ई लर्निंगमुळे पुढील १० वर्षात मुलं लिहू शकतील की नाही याची भीती वाटते...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 06:52 PM2021-12-17T18:52:42+5:302021-12-17T18:52:55+5:30
ई लर्निंगमुळे सगळ्या मुलांचे शिक्षण कॉम्प्युटरवर आणि मोबाईल वर सुरू आहे
पुणे : ई लर्निंगमुळे सगळ्या मुलांचे शिक्षण कॉम्प्युटरवर आणि मोबाईल वर सुरू आहे. या विद्यार्थ्यांची अक्षरा सोबत ओळख लिहून होणार आहे की नाही हा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. काळ पुढे सरकत असताना शिक्षण पद्धतीतही बदल होत आहे. ई लर्निंगमुळे पुढच्या 10 - 15 वर्षात मुलं लिहू शकतील की नाही याची भीती वाटते असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. राज ठाकरे यांच्या हस्ते पुण्यातील एका ई लर्निंग स्कुलचे उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते.
''मागील दोन वर्षांपासून कोरोनामूळे जनजीवन विस्कळीत आहे. दोन वर्षांपासून शाळा बंद आहेत, तर काही ठिकाणी आता सुरू होत आहेत. मात्र अजूनही पालक मुलांना शाळेत पाठवायला तयार नाहीत. कोरोनामुळे परीक्षा न देता दहावीचे विद्यार्थी पास झाले. कुणाला १०० टक्के, ९९ टक्के मार्क मिळाले. हे पाहून मी विचार करतो की आमच्यावेळेस होता कुठे कोरोना अशी मिश्किल टिप्पणी करत राज ठाकरे यांनी सवाल उपस्थित केला आहे.''
''आमची दहावी आम्ही घरगडत पास केली. आणि हा (कोरोना) इतक्या वर्षांनी आणि विद्यार्थ्यांना गुण मिळाले. माझे गुण तुम्हाला कळले तर कमालच वाटेल. कोरोनामुळे घरातूनच शिक्षण घेणे, शिक्षकांसोबत घरातूनच बोलणं यामुळे शाळेत जी मजा असते ती मजाच निघून गेली असल्याची नाराजी राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली आहे. .
''पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना तर शाळा म्हणजे काय हे अजूनही माहीतच नाही. शाळा काय असते हे त्यांना अद्यापही समजलच नसेल. परंतु आता शाळा सुरू होतात ही आनंदाची गोष्ट आहे. मुले शाळेत खेळताना दिसली की बरं वाटतं धिनते यावेळी म्हणाले आहेत.''