झाली भिर्र..भिर्र..
By admin | Published: December 6, 2014 10:47 PM2014-12-06T22:47:19+5:302014-12-06T22:47:19+5:30
खास गावरान ढंगातील निवेदन.. तापलेले ऊन.. आणि ओसंडून वाहणारा आनंद अशा चैतन्यपूर्ण वातावरणात हजारो बैलगाडा शौकीन आणि प्रेक्षकांनी बैलगाडा शर्यतींचा मनमुराद आनंद लुटला.
Next
शेलपिंपळगा : खास गावरान ढंगातील निवेदन.. तापलेले ऊन.. आणि ओसंडून वाहणारा आनंद अशा चैतन्यपूर्ण वातावरणात हजारो बैलगाडा शौकीन आणि प्रेक्षकांनी बैलगाडा शर्यतींचा मनमुराद आनंद लुटला. साबळेवाडी (ता. खेड) येथे श्री अंबिका मातादेवीच्या उत्सवानिमित्त नवसाच्या बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते.
सुमारे वर्षभराच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर शासनाने बैलगाडा शर्यतींवर घातलेली बंदी उठवून शर्यतींना पुन्हा एकदा हिरवा कंदील दाखविल्याने बैलगाडा शौकिनांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. बंदी उठवल्यानंतर खेड तालुक्यातील साबळेवाडी येथे प्रथम नवसाच्या शर्यती पार पडल्या असून, असंख्य बैलगाडा मालकांच्या बा:या घाटात जुंपण्यात आल्या. बैलगाडा शर्यतींच्या घाटाचे उद्घाटन ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले.
नवसाच्या शर्यतीदरम्यान आमदार सुरेश गोरे, अनिल राक्षे, शेलपिंपळगावचे माजी उपसरपंच संजय मोहिते आदींसह अन्य पक्षांच्या पदाधिका:यांनी विशेष हजेरी लावली होती. शर्यतींमध्ये विजेत्या स्पर्धकांना मान्यवर व ग्रामस्थांच्या हस्ते श्रीफळ देण्यात आली. शर्यती यशस्वी पार पडण्यासाठी समस्त साबळेवाडी ग्रामस्थांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
‘बैलगाडा मालकांनी नियमांचे पालन करावे’
4राजगुरुनगर : बैलगाडा शर्यत सुरू करण्याच्या केंद्र शासनाच्या निर्णयाचे अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटनेचे संचालक रामकृष्ण टाकळकर व आबा शेवाळे यांनी स्वागत केले आहे. पण या शर्यती सुरू करण्याबरोबरच बैल या प्राण्याला संबंधित राजपत्नातून वगळावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
4बैलगाडा मालकांनी आता नियम व अटींचे पालन करून शर्यती घ्याव्यात म्हणजे भविष्यात त्या चालू राहतील, असे आवाहनही त्यांनी केले.