पीडित मुलीवर मुंबईतही लैंगिक अत्याचार झाल्याचे उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:16 AM2021-09-15T04:16:17+5:302021-09-15T04:16:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : वानवडी परिसरात राहणाऱ्या एका १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तब्बल १३ जणांनी सामूहिक अत्याचार केल्याच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : वानवडी परिसरात राहणाऱ्या एका १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तब्बल १३ जणांनी सामूहिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. या मुलीवर मुंबईत गेल्यानंतर तिच्यावर ठाण्यातील एका ३० वर्षांच्या तरुणाने तिला घरी घेऊन जाऊन लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिली.
पुणे स्टेशन येथे मित्राला भेटायला गेलेल्या एका १४ वर्षांच्या मुलीला घरी सोडतो, असे सांगून एका रिक्षा चालकाने रिक्षाने नेऊन तिच्यावर बलात्कार केला होता. त्यानंतर, त्याच्या साथीदारांनी तिच्यावर दोन दिवस अत्याचार केले होते. वानवडी पोलिसांकडे तिच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिल्यानंतर, पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावून तिच्या मित्रासह १४ जणांना अटक केली आहे.
वानवडी पोलिसांना तपासादरम्यान मुंबईतही मुलीवर बलात्कार झाल्याची बाब समोर आली. पोलिसांनी आरोपीची माहिती मिळवून त्याला मुंबईतून अटक केली आहे.