प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे : भरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:11 AM2021-05-10T04:11:50+5:302021-05-10T04:11:50+5:30
कळस (ता. इंदापूर) येथे ग्रामपंचायतीच्या वतीने श्री हरणेश्वर विद्यालयात विलगीकरण कक्षाचे उद्घाटन भरणे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत ...
कळस (ता. इंदापूर) येथे ग्रामपंचायतीच्या वतीने श्री हरणेश्वर विद्यालयात विलगीकरण कक्षाचे उद्घाटन भरणे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील, सरपंच वृषाली पाटील, तहसीलदार अनिल ठोंबरे, गटविकास अधिकारी विजयकुमार परिट, सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, वैद्यकीय अधिकारी डाॅ. सुनील गावडे, बाबामहाराज खारतोडे, भरतराजे भोसले, ग्रामविकास अधिकारी दादासाहेब वाघ, पोलीस पाटील तुकाराम खाडे गणेश सांगळे ग्रामपंचायत सदस्य, आशा सेविका, आरोग्य कर्मचारी, महसूल कर्मचारी उपस्थित होते.
भरणे पुढे म्हणाले, पाॅझिटिव्ह रुग्णांचे त्याच्या घरी विलगीकरण करण्यापेक्षा ग्रामपंचायतीने सुरू केलेल्या विलगीकरण कक्षामध्ये दाखल होणे गरजेचे आहे. तालुक्यात जास्तीत जास्त विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले आहेत
गटविकास अधिकारी परिट म्हणाले, कोरोनाबाधित घरीच विलगीकरण झालेल्यांवर नजर ठेवणे मुश्कील असल्याने, ग्रामस्तरावर विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. याचा रुग्णांना फायदा होणार आहे. प्रतापराव पाटील म्हणाले, गावातील वाढत्या रुग्णांची संख्या विचारात घेता येथे तातडीने विलगीकरण कक्ष स्थापन करणे गरजेचे होते. या अनुषंगाने येथे विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला आहे.