जागा सोसायटीच्या नावावर असणे सभासदांसाठी महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:15 AM2021-01-16T04:15:23+5:302021-01-16T04:15:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सर्व सदनिका ज्या जागेवर आहेत, ती जागा सोसायटीच्या नावावर होणे तिथे राहणाऱ्या सभासदांसाठी महत्त्वाचे ...

It is important for the members to have the place in the name of the society | जागा सोसायटीच्या नावावर असणे सभासदांसाठी महत्त्वाचे

जागा सोसायटीच्या नावावर असणे सभासदांसाठी महत्त्वाचे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : सर्व सदनिका ज्या जागेवर आहेत, ती जागा सोसायटीच्या नावावर होणे तिथे राहणाऱ्या सभासदांसाठी महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी केले. जगातील सर्वाधिक आनंदी अशी ओळख झालेल्या पुणे शहरासाठी तर ही महत्त्वाचीच गोष्ट आहे, असे ते म्हणाले.

मुक्तछंद व मातोश्री रमाबाई आंबेडकर प्रतिष्ठान यांच्या वतीने माजी आमदार मेथा कुलकर्णी यांनी कोथरूडमधील सोसायट्यांसाठी या मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन शुक्रवारी केले होते. कवडे यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन झाले.

जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था दिग्विजय राठोड यांनी सोसायटीची जागा नावावर करून घेण्याच्या कायदेशीर कार्यवाहीची (मानीव अभिहस्तांतरण) सविस्तर माहिती दिली. सरकारी विशेष मोहीम १ ते १५ जानेवारी अशी होती. मात्र, हे काम त्यानंतरही करता येऊ शकतो. त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात, संस्थेचे कोणते पदाधिकारी उपस्थित लागतात, याविषयी त्यांनी सांगितले. उपस्थित सह.संस्थांच्या सभासद, पदाधिकारी यांनी विचारलेल्या शंका, उपस्थित केलेले प्रश्न यांची सविस्तर माहितीही त्यांनी दिली.

मेधा कुलकर्णी यांनी प्रास्तविक केले. पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था फेडरेशनचे सुहास पटवर्धन, नवनाथ अनपट भोसले, आशुतोष परदेशी, प्रमाणित लेखापरीक्षक अरुण महाजन, नितीन देव, संतोष धारणे, रवींद्र नेर्लेकर, तसेच कोथरूडमधील सहकारी सोसायट्यांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Web Title: It is important for the members to have the place in the name of the society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.