कोरोना संसर्ग होणारच नाही याची स्वतः काळजी घेणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:11 AM2021-04-23T04:11:41+5:302021-04-23T04:11:41+5:30

नीरा : प्रयत्न कितीही केले तरी ते तोकडे पडत आहेत, कारण कितीही सोयसुवीधा उपलब्ध करू, पण वैद्यकीय क्षेत्रात काम ...

It is important to take care that the corona does not become infected | कोरोना संसर्ग होणारच नाही याची स्वतः काळजी घेणे गरजेचे

कोरोना संसर्ग होणारच नाही याची स्वतः काळजी घेणे गरजेचे

googlenewsNext

नीरा : प्रयत्न कितीही केले तरी ते तोकडे पडत आहेत, कारण कितीही सोयसुवीधा उपलब्ध करू, पण वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे कामगार कुठून आणायचे हा प्रश्न आहे. लोकांनी कोरोना संसर्ग होणारच नाही, याची काळजी स्वतः घेणे गरजेचे आहे. लक्षणे दिसता वेळीच तपासणी करणे गरजेचे आहे. असे पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी म्हंटले आहे.

नीरा (ता. पुरंदर) येथील ज्युबिलंट इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये कोरोना सेंटर सुरू करण्यासाठीची पाहणी करण्यासाठी आ. संजय जगताप आले होते. त्यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी जगताप बोलत होते. या वेळी नीरेचे उपसरपंच राजेश काकडे, विराज काकडे, सदस्य संदीप धायगुडे, पुरंदर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमर माने, तालुका आरोग्य अधिकारी विवेक आबनावे, तलाठी बजरंग सोनवले, पोलीस पाटील राजेंद्र भास्कर, सहायक पोलीस उपनिरीक्षक कैलास गोतपागर, ग्रामसेवक मनोज डेरे, कोतवाल अप्पा लकडे, दत्ता निंबाळकर ज्युबिलंटचे पी. आ. रो. इसाक मुजावर, अजय ढगे आदी उपस्थित होते.

ज्युबिलंट इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विलगीकरण केंद्र सुरू करावे अशी मागणी नीरा व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे केली होते. या संदर्भात माजी जिल्हा परिषद सदस्य विराज काकडे व सरपंच तेजश्री काकडे यांनीही पाठपुरावा केला होता. नुकतीच या ठिकाणी पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत यांनीही भेट दिली होती. पण तरीही ज्युबिलंटचे अधिकाऱ्यांनी नकार दर्शवला.

ज्युबिलंट इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दहा वर्गखोल्या असून, प्रशस्त मैदान व वाहन पार्किंगची सोय आहे. त्यामुळे प्रथमिक स्वरूपात लक्षणे असलेल्या पन्नास रुग्णांना याठिकाणी विलगीकरण करता येऊ शकते. त्यामुळे येथे कोरोना सेंटर सुरू करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, आमदार संजय जगताप नीरेतील ज्युबिलंट स्कूलमध्ये आले असता, ज्युबिलंटचे अधिकारी याठिकाणी कोरोना सेंटर सुरू करण्यास असमर्थथा दाखवत होते. हे अधिकारी वेगवेगळी कारणे सांगत होते. अखेर आमदारांचा पारा चढला व चक्क इंग्रजीत संवाद साधला आणि एका क्षणात कंपनीचे अधिकारी शाळा द्यायला तयार झाले.

२२ नीरा

नीरा येथील ज्युबिलंट स्कूलमध्ये नव्याने कोरोना विलगीकरण केंद्र सुरू करण्यासाठी आ. संजय जगताप यांनी पाहणी केली.

Web Title: It is important to take care that the corona does not become infected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.