Balewadi sports complex बालेवाडी ट्रॅक नुकसान प्रकरणी काय झालं समजून घेणं महत्वाचं : सुप्रिया सुळे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 10:44 AM2021-06-28T10:44:23+5:302021-06-28T10:47:45+5:30
रामटेकडी कचरा प्रकल्पाच्या चौकशीची मागणी
पुण्यातील रामटेकडी कचरा प्रकल्पात सुरू असलेल्या गोंधळाची चौकशी केली जावी अशी मागणी राष्ट्रवादीचा खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.पुण्यात आज सुळे यांनी रामटेकडी कचरा प्रकल्पाला भेट दिली.यावेळी बोलताना सुळे यांनी बालेवाडीचा ट्रॅक वर गाड्या नेमक्या का गेल्या ते समजून घेणे आवश्यक असल्याचे म्हणले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून हडपसर मधल्या रामटेकडी इथल्या कचरा प्रकल्पाला नागरिक विरोध करत आहेत. प्रकल्प सुरू नसला तरीदेखील इथे ओपन डम्पिंग केले जात होते.त्याच बरोबर इथे कचरा प्रक्रिया केली जात नसताना देखील कंत्राटदाराला पैसे दिले गेल्याचा प्रकार देखील समोर आला होता. याच पार्श्वभूमीवर सुळे यांनी कचरा प्रकल्पाला भेट देत नागरिकांचा अडचणी समजून घेतल्या.
सुळे म्हणाल्या," महापालिकेकडून कंत्राटदाराला जे पैसे दिले गेले तसेच इथे जो कचरा टाकला जातो आहे तो अत्यंत गंभीर प्रकार आहे.या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणे गरजेचे आहे.आमची पालकमंत्र्यांना विनंती आहे की या प्रकरणाची दखल घेऊन त्यांनी खोलात जाऊन चौकशी करावी."
पुण्यातील उरुळी आणि फुरसुंगी या ठिकाणचे ग्रामस्थ देखील कचरा प्रकल्पाला विरोध करत आहेत. याविषयी बोलताना सुळे यांनी महापालिकेने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कचऱ्याची समस्या सोडवणे गरजेचे असल्याचं म्हणलं आहे.
बालेवाडी चा प्रश्न पालकमंत्र्यांचा कोर्टात
दरम्यान यावेळी बालेवाडी मधील सिंथेटिक ट्रॅक वर जे नुकसान झालं त्याबद्दल बोलताना सुळे म्हणाल्या की पालकमंत्री अजित पवार हे या प्रकरणात नेमके काय झाले ते पाहतील.हे नेमकं का झालं आणि नेमकं काय झालं ते समजून घेणं गरजेचं आहे. "