अल्पवयीन मुलांना दुचाकी देणे पडले महागात; पालकांविरोधात खटले दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 05:47 PM2022-11-22T17:47:19+5:302022-11-22T17:47:30+5:30

बारामती शहरामध्ये कॉलेज व महाविद्यालयांच्या समोर अनेक अल्पवयीन मुले दुचाकी फिरवताना निदर्शनास येत असतात

It is expensive to give two wheelers to minors Cases filed against parents | अल्पवयीन मुलांना दुचाकी देणे पडले महागात; पालकांविरोधात खटले दाखल

अल्पवयीन मुलांना दुचाकी देणे पडले महागात; पालकांविरोधात खटले दाखल

Next

बारामती : अल्पवयीन मुलांना दुचाकी चालविण्यास देणे पालकांना चांगलेच महागात पडले आहे. या पालकांवर बारामती शहर पोलीसांनी मंगळवारी(दि २२) केलेल्या कारवाईत खटले दाखल केले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती शहरामध्ये कॉलेज व महाविद्यालयांच्या समोर अनेक अल्पवयीन मुले दुचाकी फिरवताना निदर्शनास येत असतात. या मुलांकडे कोणत्याही प्रकारचा परवाना नसताना पालक त्यांना गाड्या चालवण्यास देत असतात. या विद्यार्थ्यावर कारवाई करून उपयोग नाही. त्यासाठी त्यांच्या पालकांवर कारवाई करावी ही कायद्यात तरतूद आहे. तरी गेल्या दोन दिवसांमध्ये बारामती शहर वाहतूक शाखेतर्फे एकूण १८ मुलांच्या पालकांवर वाहतूक अधिनियम अन्वये खटले दाखल करून कोर्टात पाठवण्यात आले आहे. त्यांना कमीत कमी पाच हजार रुपये दंड होईल. याही पुढे त्यांच्यावर सतत कारवाई केली जाणार आहे. अप्पर पोलीस अधिक्षक आनंद भोईटे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक सुनील महाडिक ,पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब जाधव,चालक कांबळे तसेच वाहतूक शाखेकडील सर्व पुरुष व महिला कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला.

Web Title: It is expensive to give two wheelers to minors Cases filed against parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.